आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी मालिकेनंतर युनिसची निवृत्ती, मिसबाहनंतर पाकचा अनुभवी खेळाडूही म्हणणार अलविदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची  - पाकिस्तानचा सर्वाधिक अनुभवी फलंदाज युनिस खानने वेस्ट इंडीजविरुद्ध एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हकनंतर आता त्याच्यासोबत युनिस खानसुद्धा सामील झाला आहे.

मिसबाहसुद्धा वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेनंतर निवृत्त होत आहे. पाकचे दोन्ही अनुभवी खेळाडू या मालिकेनंतर क्रिकेटला अलविदा म्हणतील. ३९ वर्षीय युनिसने शनिवारी  कराचीत आपल्या १७ वर्षांच्या प्रदीर्घ कसोटी करिअरला विश्रांती देण्याची घोषणा केली. उजव्या हाताचा फलंदाज युनिस म्हणाला, “मी िनवृत्तीबाबत कसलीच घोषणा करू नये, असे अनेकजण मला म्हणत आहेत. मात्र, ही योग्य वेळ आहे. खेळाडूच्या जीवनात निवृत्ती घेण्याची कठीण वेळ येते.  मला माझ्या कामगिरीवर अभिमान आहे. कोणताही खेळाडू नेहमी फिट राहू शकत नाही. प्रोत्साहन नेहमी एकसारखे असू शकत नाही. आता वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेनंतर मैदान सोडण्याची वेळ आली आहे,’ असे युनिसने म्हटले. मी जावेद मियाँदाद यांचा धावांचा विक्रम मोडला तेव्हाच मी निवृत्ती घेण्याचे ठरवले होते. मात्र, मला  चाहत्यांनी प्रोत्साहित केले आणि मी खेळणे कायम ठेवले. आता शरीर पूर्वीइतके फिट नाही, असेही त्याने नमूद केले.
 
मिसबाह, युनिसला विक्रमाची संधी
मिसबाह, युनिसच्या निवृत्तीनंतर पाकला १९० कसोटी अनुभव असलेल्या खेळाडूंची उणीव जाणवेल. युनिसला कसोटीत १० हजार धावांसाठी २३ धावांची गरज आहे. युनिसने ही कामगिरी केली तर तो कसोटीत १० हजार धावा पूर्ण करणारा पाकचा पहिला फलंदाज ठरेल, तर मिसबाहला ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ४९ धावांची गरज आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...