आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारत-न्यूझीलंड यांच्यात ‘रन’संग्राम!, भारत 2-1 ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - वर्ल्डकप उपविजेता न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना रविवारी येथील पीसए मोहालीत होईल. दोन्ही संघ या मैदानावर प्रथमच समोरासमोर असतील. शनिवारी दोन्ही संघांनी कसून सराव केला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. रविवारचा सामना जिंकून मालिकेत २-१ ने आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

कसोटी मालिकेत व्हाइटवॉश झेलणारा न्यूझीलंड संघ दिल्लीत विजयानंतर उत्साहित आहे. न्यूझीलंडने मोहालीत तीन सामने खेळले असून त्यांना येथील खेळपट्टीची माहिती आहे. न्यूझीलंडच्या दिल्लीतील विजयाने मालिका रोमांचक बनली आहे.

सचिनच्या विक्रमावर नजर
मोहालीत किवी फलंदाज मार्टिन गुप्तिलकडे येथे वनडेत ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याची संधी असेल. धोनीच्या नावे सध्या ८९७८ धावा असून वनडेत ९००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. धोनीने वनडेत आतापर्यंत १९३ षटकार खेचले आहेत, तर सचिनने १९५ षटकार वनडेत मारले. षटकारांच्या शर्यतीत सचिनला मागे टाकण्याचे प्रयत्न धोनी करेल. फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनीने ७ षटकार मारले, तर तो वनडेत २०० षटकार ठोकणारा पहिला भारतीय बनू शकतो.
आजारी रैना बाहेर
भारताचा मधल्या फळीचा फलंदाज सुरेश रैना अद्याप फिट न झाल्याने तो तिसऱ्या वनडेतून बाहेर झाला आहे.
दोन्ही संभाव्य संघ असे
भारत
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, सुरेश रैना, केदार जाधव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, जयंत यादव, मनदीप सिंग, अमित मिश्रा.
न्यूझीलंड
केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम लँथम, मार्टिन गुप्तिल, रॉस टेलर, ल्युक रोंची, मिशेल सँटनर, ईश सोढी, जिमी निशाम, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, टीम साउथी, अँटोन डेविच, डग ब्रेसवेल, मॅट हेनरी, बी. जे. वॉटलिंग.
बातम्या आणखी आहेत...