आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजयी हॅट‌्ट्रिकचे भारताचे प्रयत्न, शनिवारपासून पहिल्या कसोटीला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजला पोहोचला आहे. मालिकेतील पहिली कसोटी २१ जुलैपासून रंगेल. टीम इंडिया ९ जुलैपासून बासेटेरे येथे बोर्ड प्रेसिडंट इलेव्हन संघाविरुद्ध दोनदिवसीय सराव सामन्यापासून करेल. या दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य कॅरेबियन भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याची हॅट्िट्रक करण्यावर असेल.

भारतीय संघाने २००६ मध्ये राहुल द्रविड आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली १-० ने कसोटी मालिका जिंकली होती. टीम इंडियाने आतापर्यंत वेस्ट इंडीजमध्ये दहा मालिका खेळल्या असून, यात ३ मालिका जिंकल्या आणि ७ गमावल्या.

४५ सामन्यांत केवळ ५ विजय

भारताने वेस्ट इंडीजला तीन कसोटी मालिकेत हरवले असले तरीही सामन्यांच्या हिशेबाने कामगिरी पाहिली तर भारताचे प्रदर्शन दुबळे ठरेल. भारताने १९५३ पासून आतापर्यंत वेस्ट इंडीजमध्ये एकूण ४५ कसोटी सामने खेळले. यात केवळ ५ सामने भारताने जिंकले. १६ सामने गमावले आणि २४ सामने ड्रॉ झाले आहेत. भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध एकूण १९४८ पासून आतापर्यंत ९० कसोटी खेळले आहे.


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...