आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विराट म्हणाला-इतके सामने होताहेत की तयारीला वेळ नाही; कोहलीची कसोटीपूर्वी टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शुक्रवारपासून नागपुरात भारत व श्रीलंकेत दुसरा कसोटी सामना होत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत क्रिकेटच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकाचा मुद्दा मांडला. कोहली म्हणाला, ‘ही मालिका संपण्यात व द. आफ्रिकेला जाण्यादरम्यान २ दिवसांचा वेळ आहे. १ महिना मिळाला असता तर उत्तम तयारी केली असती. व्यग्र वेळापत्रकामुळे तयारीला वेळही मिळत नाही.’ 


विराटच्या या दाव्यात तथ्य असून भारताने यंदा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ४५ सामने खेळले आहेत. वर्षाखेरपर्यंत आणखी ८ सामने होतील. वर्षभरातील सामन्यांची संख्या ५३ वर पोहोचेल. १० वर्षांचा हा उच्चांक आहे. यापूर्वी २००७ मध्ये संघाने ५५ सामने खेळले होते. १५ नोव्हेंबरलाही कोहली म्हणाला होता, ‘मी रोबोट नाही. मलाही थकवा येतो, पण विश्रांती लागेल तेव्हा स्वत:हून घेईल.’ जास्त सामन्यांमुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होतो, असे दिसत नाही. २००२ मध्ये ५१ सामने खेळले व आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. २००७ मध्ये ५५ सामने खेळूनही टी-२० चे विश्वविजेतेपद मिळवले. यंदाही ४५ पैकी ३१ सामने जिंकले आहेत.  

 

गेल्या तीन वर्षांत श्रीलंका संघाचे सर्वाधिक सामने 

- श्रीलंका १३३ 
- भारत १२७ 
- इंग्लंड १२५ 
- पाकिस्तान ११६ 
- ऑस्ट्रेलिया ११३ 

 

भारताचे २० वर्षांत ५ वेळा ५० सामने  

-  १९९७ ५१ 
-  १९९९ ५३ 
- २००२ ५१ 
- २००७ ५५ 
- २०११ ५०

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, आनखी माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...