आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला विश्वचषकासाठी बक्षीस रकमेत झाली वाढ, अायसीसीचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- महिलांच्या क्रिकेटला अांतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्यासाठी अाता अायसीसी पुढाकार घेत अाहे. यासाठी अाता अायसीसीने चक्क विश्वविजेत्या महिला टीमवर काेट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्याचा निर्णय घेतला. कारण विश्वचषक विजेत्या महिला संघाला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत माेठी वाढ करण्यात अाली. अाता नव्या निर्णयानुसार विजेत्या संघाचा ६,६०, ००० डाॅलरचे बक्षीस देऊन गाैरवण्यात येईल. याशिवाय उपविजेता संघ ३,३०,००० डाॅलरच्या बक्षिसाचा मानकरी ठरेल. तसेच सेमीफायनलिस्ट संघांनाही बक्षीस देण्यात येणार अाहेत. यासाठी या संघांना प्रत्येकी १,६५,००० डाॅलरचे बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात अाला. या नव्या निर्णयाने अाता महिला संघांचा अात्मविश्वास दुणावेल अाणि महिला क्रिकेटला नवीन अाेळख मिळेल, असा विश्वास अायसीसीने व्यक्त केला. यासाठी इंग्लंडमध्ये नुकतीच एक बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. या बैठकीमध्ये अायसीसीने अागामी काळामध्ये महिलांच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी माेठ्या स्पर्धा अायाेजनावर चर्चाही केली. 
 
२४ जूनपासून वर्ल्डकप : येत्या २४ जूनपासून महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेेला सुरुवात हाेणार अाहे. ही स्पर्धा २४ ते २३ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये रंगणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...