आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी-युवराजने व्हिडिओ जाहीर करून दाखवली ‘मैत्री’, दोघांनी केली एकमेकांची स्तुती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि युवराजसिंग यांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवर  शेअर केला असून यात दोघांनी एकमेकांची स्तुती केली आहे. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेआधी कर्णधारपद सोडणारा धोनी आणि युवराजने पहिल्या सराव सामन्यात शानदार फलंदाजी करताना भारत- अ संघाकडून अर्धशतके ठोकली होती.  
व्हिडिओत युवराज आनंदात धोनीच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे. युवराजने लिहिले की, ‘एक कर्णधार म्हणून तुझे करिअर खूप चांगले राहिले आहे. यात तीन मोठे विजय, दोन विश्वचषक आणि आता जुना धोनी पुन्हा दिसण्याची वेळ आहे.’  या व्हिडिओत दोघांनी एकमेकांची स्तुती करून आपली ‘मैत्री’ दाखवली. या दोघांच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनेकांना या व्हिडिओने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. धोनीसुद्धा आपल्या शैलीत युवराजला उत्तर देत आहे. यात युवराजने भारतीय क्रिकेटच्या यशासाठी धोनीच्या योगदानाची प्रशंसा करताना तो सर्वोत्तम कर्णधार असल्याचे म्हटले.
 
व्हिडिओत दोघांत झालेली चर्चा अशी.....
धोनी : माझा प्रवास खूपच शानदार ठरला. अप्रतिम. संघात तुझ्यासारखे (युवराज) खेळाडू असल्याने नेहमी मदत झाली. यामुळे माझे काम सोपे झाले. मी माझ्या १० वर्षांचा पूर्ण आनंद लुटला. येणारा जो काही वेळ माझ्या हातात आहे, त्याचा मी असाच आनंद घेईन, अशी आशा आहे.  

युवराज : धोनी, आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात खेळताना मला खूप आनंद मिळाला, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या. विश्वचषक जिंकले आणि कसोटीत नंबर वनही बनलो.  

धोनी : धन्यवाद. मीसुद्धा तुझे सहा षटकार पाहिले आहेत. यावर युवराज लगेच म्हणाला, ‘तुझे मनापासून आभार. मला अशा क्षणी नेहमी संधी दिल्याबद्दल धन्यवाद.’  

युवराज : आता तू कर्णधार नाहीस, तर तू आणखी षटकार मारणार आहेस काय?  
धोनी : बघूया. गोलंदाजांनी मला हवा तसा चेंडू टाकला तर मी नक्की षटकार मारीन.