आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रींवरुन धोनी-कोहलीत मतभेद? बोर्डाने 2016 पर्यंत कोच नियुक्ती टाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडिया कोचचा वाद काही शमताना दिसत नाही. एका इंग्रजी वेबसाइटने केलेल्या दाव्यानूसार, टी-20 वर्ल्डकप-2016 पर्यंत नियमीत कोचचे पद रिक्त राहाणार आहे. या वृत्तानूसार, बीसीसीआयने कोचची नियुक्ती पुढच्या वर्षापर्यंत स्थगित केली आहे.याआधी बांगलादेश दौऱ्यानंतर नियमीत कोचची नियुक्ती केली जाईल अशी चर्चा होती. बांगलादेश दौऱ्या दरम्यान टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री अंतरिम कोच होते, तर बॉलिंग कोच भारत अरुण, फिल्डिंग कोच आर.श्रीधर आणि बॅटिंग कोच संजय बांगर हातो.
बीसीसीआयने पुढील वर्षापर्यंत कोचची नियुक्ती न करण्याच्या निर्णयामागे कसोटी कर्णधार विराट कोहली आणि एकदिवसीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यातील मतभेद कारणीभूत असल्याचे मानले जाते आहे. शास्त्री कोच असावे यासाठी कोहली प्रयत्न करत असल्याचा दावा वेबसाइटच्या वृत्तात करण्यात आला आहे, तर धोनीने माजी कसोटीपटूची कोच पदी नियुक्ती करण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याची पसंती अजूनही यापूर्वीचे कोच डंकन फ्लेचर यांनाच असल्याचे दिसते.
धोनी - कोहली मतभेद
बांगलादेश दौऱ्याच्या शेवटी एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नव्या कोच संदर्भातील प्रश्नावर, संघाला सध्या कोचची गरज नसल्याचे म्हटले होते. धोनी म्हणाला होता,'टीम सध्या चांगले प्रदर्शन करत आहे. सपोर्ट स्टाफ सक्षम आहे.' दुसरीकडे विराट कोहली टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांच्या कोचपदी नियुक्तीच्या बाजूने होता. शास्त्री देखील कोचपदी कायम राहाण्यास उत्सूक आहेत. बांगलादेश दौऱ्याआधी ते म्हणाले, होते, माझा कार्यकाळ आपेक्षेपेक्षा जास्त असेल.
'शास्त्री टीम'च झिम्बॉब्वे आणि अफ्रिका दौऱ्यावर
आगामी झिम्बॉब्वे आणि अफ्रिका दौऱ्यावर रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी कोच यांची टीमच असणार आहे. 6 जुलै रोजी टीम इंडिया झिम्बॉब्वे दौऱ्य़ावर जाईल. त्यानंतर साऊथ आफ्रिका दौऱ्यात 3 वनडे आणि एक टी - 20 सामना खेळला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनूसार टीम मॅनेजमेंट तीनही असिस्टंट कोचच्या मार्गदर्शनाने समाधानी असून त्यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या विचारात आहे.
बातम्या आणखी आहेत...