आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेंद्रसिंग धोनी विरोधात अजामीनपात्र वॉरंट, धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंतपूर- वन डेत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरुद्ध आंध्र प्रदेशच्या अनंतपूर न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट बजावले. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने ही कारवाई केली. धोनीला २५ फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

एका मासिकाच्या मुखपृष्ठावर धोनीचे छायाचित्र छापण्यात आले होते. त्यात त्याला भगवान विष्णूच्या रूपात दाखवण्यात आले होते. त्याच्या हातात विविध कंपन्यांचे साहित्य होते. एका हातात बूट दाखवण्यात आला होता. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप करून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्यामसुंदर यांनी धोनीविरोधात याचिका दाखल केली होती.
बातम्या आणखी आहेत...