आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी विरोधात अजामीनपात्र वॉरंट , विष्णूच्या अवतारात दाखवल्याचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंतपूर - आंध्रप्रदेशच्या एका कोर्टाने क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. अनंतपूरच्या कोर्टात त्याच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी आहे.

कुठे दाखवले होते धोनीला विष्णूचा अवतार
- बिझनेस टुडेच्या एप्रिल 2013 च्या अंकात टीम इंडियाचा कर्णधार धोनीचा एक फोटो प्रकाशित करण्यात आला होता. त्यात त्याला विष्णूच्या अवतारात दाखवण्यात आले होते.
- त्याच्या बहुभूजांमध्ये अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट होते. त्यात हातात बुट देखिल होते.
- फोटो खाली लिहिले होते, 'गॉड ऑफ बिग डिल्स'.
- याआधी 2014 च्या जूनमध्ये धोनीविरोधात वॉरंट निघाले होते.

कोणी केली तक्रार
- विश्व हिंदू परिषदेचे नेते श्याम सुंदर यांनी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये कोर्टात याचिका दाखल केली होती.
- त्यांनी आरोप केला होता, की धोनीने भगवान विष्णूचा अवमान केला आहे.
- धोनी विरोधात अशाप्रकारची तक्रार, दिल्ली आणि पुण्यातही दाखल झाली होती.
बातम्या आणखी आहेत...