आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी नव्हे कोणी दुसरीच होती धोनीचे पहिले प्रेम, GFचा अपघातात झालाय मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसमवेत.. - Divya Marathi
महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसमवेत..
स्पोर्टस डेस्क- टीम इंडियाचा वनडे आणि टी-20 चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनातील पहिले प्रेम त्याची पत्नी साक्षी नव्हे, तर दुसरी एक मुलगी होती. धोनीवर तयार होत असलेला चित्रपट ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू बनण्याच्या आधी धोनीचे त्या मुलीवर जिवापाड प्रेम होते. जाणून घ्या कशी होती सीक्रेट लव्ह स्टोरी...
- ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा धोनीचे वय केवळ 20 वर्षे होते.
- तेव्हा धोनी स्टार नव्हता व क्रिकेटमध्ये यश मिळविण्यासाठी मोठी मेहनत घेत होता.
- यादरमयान धोनीच्या आयुष्यात प्रियंका झा नावाची मुलगी आली होती.
- धोनीचे तिच्यावर खूप प्रेम होते आणि तिच्याशी लग्न करण्याच्या विचारात होता.
- त्यांचे प्रेमप्रकरण सुरू असताना धोनीची टीम इंडियात निवड झाली. त्यानंतर दोघांत असे काही घडले की दोघे नेहमीसाठी विभक्त झाले आणि नंतर कधीही भेटू शकले नाहीत.
- 2003-04 मध्ये धोनीने तीन देशांच्या मालिकेत शानदार प्रदर्शन केले होते. - ‘इंडिया-ए’कडून खेळताना त्याने केनिया, झिम्बाब्वेविरुद्ध एकूण 362 धावा ठोकल्या होत्या.
- तेव्हापासून धोनी तेव्हाचा भारतीय कर्णधार सौरव गांगुलीच्या नजरेत होता.
- गांगुलीच्या प्रयत्नामुळेच धोनीची टीम इंडियात निवड झाली. धोनी यानंतर क्रिकेटमध्ये खूप व्यग्र झाला.
- यानंतर एका विदेश दौ-याहून परतल्यानंतर त्याला कळले की एका अपघातात प्रियंकाचा मृत्यू झाला आहे.
निराशेतून बाहेर निघण्यास वेळ-
आपल्या प्रेमाच्या आठवणीतून बाहेर निघण्यासाठी धोनी पूर्णपणे क्रिकेटमध्ये व्यग्र झाला.
- तिच्या अपघाती निधनामुळे धोनीला धक्का बसला होता. यातून बाहेर निघण्यासाठी त्याला बराच वेळ लागला.
- क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना त्याने 2005 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध शानदार शतक ठोकले. यानंतर तो भारतीय संघात स्थिरावला व प्रियंकाच्या आठवणी मागे सोडून पुढे जाऊ लागला.
सप्टेंबरमध्ये चित्रपट होणार रिलीज-
महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ हा - चित्रपट 30 सप्टेंबर 2016 रोजी रिलीज होणार आहे.
- या चित्रपटात त्याच्या वैयक्तिक जीवनाशिवाय क्रिकेटवरही फोकस करण्यात आला आहे.
- धोनीचा रोल अभिनेता सुशांत सिंग राजूपत करीत आहे तर साक्षीची भूमिका कियारा आडवाणी करीत आहे.
पुढे स्लाईडद्वारे जाणून घ्या, धोनीचे दोन अभिनेत्रीसोबत होते अफेयर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...