आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये आता युवीवर बोली, आधी झाला होता यादीतून गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गत आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक १६ कोटींची बोली लागलेला युवराजसिंग यंदाच्या आयपीएल यादीतून गायब झाला होता. मात्र येत्या ६ फेब्रुवारीला बंगळुरू येथे होणाऱ्या आयपीएलच्या यंदाच्या प्रमुख लिलावात युवराजसिंग आणि ईशांत शर्मा, शेन वॉटसन, केविन पीटरसन, डेल स्टेन, अॅरॉन फिंच, मार्टिन गुप्तिल व ड्वेन स्मिथ यांचा मानांकित खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
३५१ खेळाडूंचा लिलाव होणार असून त्यात २३० भारतीय तर १२१ परदेशी खेळाडू आहेत. ७१४ खेळाडूंमधून या ३५१ खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यातून ११६ खेळाडूंचीच खरेदी होणार आहे. युवराज, ईशांत, वॉटसन, पीटरसन यांची लिलावासाठी पायाभूत किंमत २ कोटी असेल.