आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंबर वन रवींद्र जडेजा आता टाॅप अाॅलराउंडर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीतील उल्लेखनीय अष्टपैलू कामगिरीच्या बळावर रवींद्र जडेजाने टीम इंडियाला मालिका विजय मिळवून दिला. त्याचे भारताच्या माेठ्या फरकाच्या विजयात माेलाचे याेगदान ठरले. जडेजाने (७०) दुसऱ्या कसाेटीत नाबाद अर्धशतकासह गाेलंदाजीत ७ विकेट घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. ही अष्टपैलू खेळी त्याच्यासाठी दुहेरी अानंद देणारी ठरली. या  विजयामुळे ताे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. याशिवाय  त्याला अायसीसीच्या कसाेटी क्रमवारीत माेठी प्रगती साधता अाली. रवींद्र जडेजा हा जगातील नंबर वन अाॅलराउंडर झाला अाहे. त्याने  शकीब अल हसनला पिछाडीवर टाकले. 
 
बातम्या आणखी आहेत...