आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे मालिका : डेव्हिड वाॅर्नरचे झंझावाती शतक; अाॅस्ट्रेलियाचा मालिका विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबेरा - डेव्हिड वाॅर्नरने अापल्या वनडे करिअरमधील दहावे शतक ठाेकून संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने ११५ चेंडूंचा सामना करताना १४ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे ११९ धावा काढल्या. याशिवाय त्याने फिंचसाेबत ६८ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर त्याने स्मिथसाेबत दुसऱ्या गड्यासाठी १४५ धावांची भागीदारी केली.कॅनबेरा - जबरदस्त फाॅर्मात अालेल्या अाॅस्ट्रेलिया संघाने मंगळवारी न्यूझीलंडवर मालिका विजय संपादन केला. यजमान अाॅस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर ११६ धावांनी मात केली. यासह अाॅस्ट्रेलियाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेतली.
पॅट कमिन्स (४/४१), मिशेल स्टार्क (२/५२) अाणि हेझलवूड (२/४२) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर अाॅस्ट्रेलियाने ४७.२ षटकांत सामना जिंकला. अाॅस्ट्रेलियाचा मालिकेतील हा सलग दुसरा विजय ठरला.

सामनावीर डेव्हिड वाॅर्नर (११९), कर्णधार स्टीव्हन स्मिथ (७२) अाणि मिशेल मार्शच्या (नाबाद ७६) झंझावाताच्या बळावर अाॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमाेर विजयासाठी खडतर ३७९ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला ४७.२ षटकांत अवघ्या २६२ धावांत गाशा गुंडाळावा लागला. पॅट कमिन्स, स्टार्क अाणि हेझलवूडने शानदार गाेलंदाजी करताना अाॅस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सनने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. याशिवाय निशामने ७४ अाणि सलामीवीर मार्टिन गुप्तिलने ४५ धावांचे याेगदान दिले. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता अाला नाही.

संक्षिप्त धावफलक : अाॅस्ट्रेलिया : ५ बाद ३७८ धावा, न्यूझीलंड : २६२ धावा.

बातम्या आणखी आहेत...