Home »Sports »From The Field» ODIs Against Australia; Team Indias Mission Series Vijay Will Start From Azaj!

अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे; टीम इंंडियाचे ‘मिशन मालिका विजय’ अाजपासून सुरू होणार!

वृत्तसंस्था | Sep 17, 2017, 03:00 AM IST

  • अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे; टीम इंंडियाचे ‘मिशन मालिका विजय’ अाजपासून सुरू होणार!
चेन्नई-यजमान टीम इंडिया अाता श्रीलंका दाैऱ्यातील निर्विवाद वर्चस्वाचा कित्ता अापल्या घरच्या मैदानावर गिरवण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी यजमान भारतीय संघासमाेर मिशन मालिका विजय अाहे. यामध्ये भारताचा संघ पाहुण्या अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार अाहे. या वनडे मालिकेला अाज रविवारपासून सुरुवात हाेईल. भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा सलामी सामना चेन्नईच्या मैदानावर रंगणार अाहे. श्रीलंका दाैऱ्यातील तिन्ही फाॅरमॅटच्या मालिका विजयाने भारतीय संघाचा अात्मविश्वास द्विगुणित झालेला अाहे.
अक्षर पटेलच्या जागी अाता रवींद्र जडेजा खेळणार अाहे. त्याचे संघात पुनरागमन झाले. धवनच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेला सलामीला फलंदाजीची संधी मिळेल.
वर्षभरात कांगारूंनी जिंकला एक वनडे
दुसरीकडे अाॅस्ट्रेलियन टीमला गत वर्षभरात विदेश दाैऱ्यात समाधानकारक खेळी करता अालेली नाही. या वर्षभरात अाॅस्ट्रेलियाने एकूण ११ वनडे खेळले. मात्र, एकाच वनडेत अाॅस्ट्रेलियाला विजयी पताका फडकवता अाली. इतर अाठ वनडेत अाॅस्ट्रेलियाने पराभवाचा सामना केला. तसेच दाेन सामने अनिर्णीत राहिले अाहेत. या रेकाॅर्डमुळे सध्या अाॅस्ट्रेलियन दबावात अाहे.
भारताचे १६ विजय
भारतीय संघाने यंदाच्या सत्रामध्ये अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावताना वनडेत घवघवीत यश संपादन केले. भारताने वर्षभरात एकूण २३ वनडे सामने खेळले. यातील १६ वनडे सामन्यांत भारताने विजयाची नाेंद केली. यामध्ये श्रीलंका दाैऱ्यातील पाच वनडे सामन्यातील विजयाचा समावेश अाहे.

Next Article

Recommended