आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी दिले वाऱ्यावर साेडून, अाईने बनवले वर्ल्ड चॅम्पियन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीसोबत ब्रॅडले व्हिंगिस - Divya Marathi
पत्नीसोबत ब्रॅडले व्हिंगिस
अाॅलिम्पिक चॅम्पियन इंग्लंडचा सायकलिस्ट ब्रॅडले व्हिंगिसच्या उज्ज्वल करिअरमध्ये अाईने केलेल्या त्यागाचे याेगदान अाहे. याच अाठवड्यात एका तासात सर्वाधिक ५४.५ किमी सायकल चालवण्याचा विश्वविक्रम त्याने केला अाहे. या वेळी त्याने करिअरमधील संघर्ष कथन केला. १८ महिन्यांचा असताना त्याचे वडील गॅरी यांनी अाईला साेडून दिले. त्यानंतर तिची १८ वर्षांनंतर वडिलांशी भेट झाली. त्याचे सायकलिस्ट असलेलेे वडील हे ड्रॅग्जचे माफिया हाेते. गॅरी हे एम्फेटामिंस नावाच्या पदार्थाची डाळीमधून तस्करी करत हाेते. याचदरम्यान, गॅरीची २००८ मध्ये हत्या करण्यात अाली हाेती.

तर... सायकलिस्ट झाला नसता
३५ वर्षीय व्हिंगिसच्या मते, बालपणी वडिलांची साथ मिळाली असती, तर मी कधीही सायकलिस्ट झालाे नसताे. त्याचे करिअर हे दुसऱ्या क्षेत्रामध्ये घडले असते.

अाई स्वत: कर्जबाजारी झाली
व्हिंगिस कुटंुब हे यापूर्वी हाॅलंड येथे वास्तव्यास हाेते. पती गॅरी हे अाॅस्ट्रेलियाला निघून गेल्यानंतर ब्रॅडलेची अाई लिंडा इंग्लंडमध्ये अाली हाेती. या वेळी त्याच्या अाईने तब्बल ५० हजार पाउंडचे (५० लाख) कर्ज घेतले हाेते.

अाॅलिम्पिक पदकानंतरही निराश
२००४ मध्ये अाॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावल्यावरही ताे कुटंुबावरचे कर्ज फेडू शकला नाही. त्यामुळे ताे अनेक महिने निराश हाेता. मात्र, या वेळी त्याला अाईने समजावून सांगितले अाणि त्यातूनच त्याची निराशा दूर झाली. मुलाचे अायुष्य अंधकारमय हाेऊ नये, असेच तिला वाटत हाेते.

नाइटहुडची पदवी घेण्यास नकार
व्हिंगिसने २०१२ मध्ये नाइटहुडची पदवी घेण्यास नकार दिला हाेता. अखेर इंग्लंडचे प्रसिद्ध गायक पाॅल वेलर यांच्या खास अाग्रहास्तव त्याने ही पदवी स्वीकारली.

यासाठी व्हिंगिस अाहे खास
{अाॅलिम्पिकमध्ये ४ सुवर्णांसह एकूण सात पदके.
{वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ७ सुवर्णांसह एकूण १३ पदके. {२०१२ च्या टुर द फ्रान्सचा चॅम्पियन {"सर' पदवी.