आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाेमान, अफगाणिस्तान टी-२० विश्वचषकासाठी पात्र; अाेमानकडून नामिबियाचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नामिबियाविरुद्ध सामन्यातील विजयानंतर जल्लाेष करताना अाेमान क्रिकेट संघाचे खेळाडू. - Divya Marathi
नामिबियाविरुद्ध सामन्यातील विजयानंतर जल्लाेष करताना अाेमान क्रिकेट संघाचे खेळाडू.
डबलीन- ‘जिशान’च्या चमकदार कामगिरीच्या बळावर अाेमान संघाने अायसीसीच्या अागामी विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिमाखदारपणे प्रवेश केला. उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर अाेमानला या वर्ल्डकपची पात्रता पूर्ण करता अाली. एका दिवसांच्या अंतरात अफगाणिस्तानपाठाेपाठ अाेमान संघानेही वर्ल्डकपमधील अापला प्रवेश निश्चित केला. अागामी २०१६ ची विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवणार अाहे. अाता स्पर्धेत सहभागी हाेणाऱ्या १६ संघांनी अापापले प्रवेश निश्चित केले अाहेत.
जिशानचे नाबाद अर्धशतक
जिशान सिद्धिकीच्या (५१) नाबाद अर्धशतकाच्या बळावर अाेमान संघाने गुरुवारी रात्री टी-२० सामन्यात नामिबियावर ५ गड्यांनी मात केली. या शानदार विजयासह अाेमानचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने ९ बाद १४८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अाेमान संघाने १९ षटकांत ५ गड्यांच्या माेबदल्यामध्ये लक्ष्य गाठले. जिशानने नाबाद ५१ धावांची खेळी करून संघाला ६ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या जिशानला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले.

अफगाणचा ‘मंगल’मय प्रवेश नवराेजच्या (नाबाद ६५) मंगलमय कामगिरीमुळे अफगाणिस्तानलाही अागामी टी-२० विश्वचषकातील प्रवेश निश्चित करता अाला. मंगलच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर अफगाणिस्तानने पापुअा न्यू गिनीचा पराभव केला. अफगाणिस्तानने ६ गड्यांनी सामना जिंकला. या विजयासह अफगाणच्या टीमने अागामी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे तिकीट मिळवले.