आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • On Sourav Ganguly\'s 44th Birthday, See VERY RARE PICS OF Prince Of Kolkata

सौरव गांगुलीचे असे 20 PHOTOS, कदाचित तुम्ही प्रथमच पाहत असाल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरसोबत सौरव गांगुली (डावीकडे वर). पत्नी डोनासोबत सौरव (डावीकडे खाली). तिस-या फोटोत तुम्हाला लक्षात येईल की दादाचा स्टारडम कसा होता. एक महिला फॅन्स दादासाठी कशी वेडी झाली होती. - Divya Marathi
सचिन तेंडुलकरसोबत सौरव गांगुली (डावीकडे वर). पत्नी डोनासोबत सौरव (डावीकडे खाली). तिस-या फोटोत तुम्हाला लक्षात येईल की दादाचा स्टारडम कसा होता. एक महिला फॅन्स दादासाठी कशी वेडी झाली होती.
स्पोर्ट्स डेस्क- माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने आपला 44 वा जन्मदिवस शुक्रवारी साजरा केला. दादा नावाने क्रिकेट जगात प्रसिद्ध गांगुली सध्या कोलकाता असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चा अध्यक्ष आहे. गांगुलीचा जन्म 8 जुलै 1972 रोजी कोलकाता येथे झाला. दादाला असे कर्णधार मानले जाते त्याने भारतीय संघाला विजयाची सवय लावली. तो आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जायचा. पूर्वीचे भारतीय खेळाडू परदेशी खेळाडूना वचकून असायचे. मात्र दादा परदेशी खेळाडूंना भिडायचा. त्यातून संघाला प्रेरणा मिळायची. 2002 साली इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट करंडक जिंकल्यानंतर दादाने सर्वासमोर लॉर्डसवर टी-शर्ट काढून हवेत फिरवला होता. तो क्षण भारतीय क्रिकेट फॅन्स अद्याप विसरलेले नाहीत कदाचित विसरूही शकणार नाहीत.
असे राहिले दादाचे करिअर
- भारतासाठी दादाने 113 कसोटी खेळल्या. यात त्याने 16 शतके आणि 35 अर्धशतके ठोकली. कसोटीत त्याने 7212 धावा ठोकल्या. 239 धावा हा त्याचा सर्वोच्च स्कोर होता.
- दादाने 311 एकदिवसीय सामने खेळत 22 शतके आणि 72 अर्धशतके ठोकली. तसेच 11 हजार 363 धावा बनविल्या. 183 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

प्रिन्स ऑफ कोलकाता नावाने बंगालमध्ये ओळख असलेल्या दादांचा अंदाज पुढील 20 फोटोमधून तुम्हा पाहू शकता...
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सौरव गांगुलीचे कदाचित तुम्ही कधीच न पाहिलेले फोटो....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...