आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मयंकच्या शतकाने भारत \"अ\'चा द. आफ्रिकेवर शानदार विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - सलामीवीर मयंक अग्रवालच्या (१३० धावा) दमदार शतकाच्या बळावर भारत अ संघाने रविवारी दक्षिण आफ्रिका अ संघाला ८ विकेटने हरवले. मयंकशिवाय कर्णधार उन्मुक्त चंद आणि ऋषी धवनसुद्धा विजयाचे शिल्पकार ठरले. उन्मुक्त चंदने ९० धावांची खेळी केली, तर ऋषीने चार गडी बाद केले.
तिरंगी मालिकेतील भारत अ संघाचा दोन सामन्यांतील हा पहिला विजय ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाला ११९ धावांनी हरवले होते. तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघ दोन विजयांसह आणि १० गुणांसह सध्या गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. भारत अ संघ ५ गुणांसह दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका अ संघ शून्य गुणासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
द. आफ्रिका अ संघाने सकाळी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या (१०८) शतकाच्या बळावर द. आफ्रिका अ संघाने भारत अ संघाविरुद्ध ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा काढल्या. आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर हेन्ड्रिक्स १, ब्रुईन ५, तर कर्णधार डीन एल्गर ५ धावा काढून बाद झाले. आफ्रिकेचा संघ ३ बाद ४४ असा संकटात सापडला होता. डी.कॉकने डाव सावरला.

१३० धावांची खेळी मयंक अग्रवालने केली . ९० धावा उन्मुक्त चंदने काढल्या . ०४ विकेट ऋषी धवनने घेतल्या

भारताची सलामी
दक्षिण आफ्रिका अ संघाने भारत अ संघाला विजयासाठी दिलेले २४५ धावांचे लक्ष्य खूपच छोटे ठरले. भारताची सलामी जोडी मयंक अग्रवाल आणि उन्मुक्त चंद यांनी ३४.४ षटकांत २१९ धावांची सलामी देऊन सामन्याचे चित्रच बदलले. याच स्कोअरवर डीन एल्गरने उन्मुक्त चंदला पायचीत केले. कर्णधार चंदचे शतक थोडक्याने हुकले. त्याने ९४ चेंडूंत २ षटकार आणि ८ चौकारांसह ९० धावा काढल्या. मयंक अग्रवालने १२२ चेडूंत १३० धावा केल्या.
मयंकच्या शतकाने विजय झाला सोपा
भारताला विजयासाठी २ धावांची गरज असताना मयंक बाद झाला. मयंकने १२२ चेंडूंत १ षटकार आणि १६ चौकारांसह १३० धावा ठोकल्या. मयंकने १०६.५५ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. मनीष पांडेने नाबाद ९, तर करुण नायरने नाबाद ४ धावा काढून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताने तब्बल ७४ चेंडू आणि ८ विकेट शिल्लक ठेवून सहज विजय मिळवला.
धावफलक
दक्षिण आफ्रिका अ धावा चेंडू ४ ६
हेन्ड्रिक्स धावबाद (शर्मा) ०१ ०८ ० ०
डी. कॉक झे. पटेल गो. धवन १०८ १२४ १३ १
ब्रुईन झे. सॅमसन गो. धवन ०५ २५ ० ०
डीन एल्गर त्रि. गो. कर्ण शर्मा ०५ १८ ० ०
रामेला झे. सॅमसन गो. पटेल २६ ४० १ ०
विलास झे. संदीप गो. धवन ५० ५० ३ ३
झोंडो पायचीत गो. धवन ०० ०३ ० ०
विल्जोन झे. पटेल गो. कुलकर्णी १५ २० १ ०
शेझी झे. कुलकर्णी गो. संदीप ०१ ०२ ० ०
एडी ली नाबाद १२ ०७ १ १
त्सोत्सोबे त्रि. गो. संदीप ०१ ०३ ० ०
अवांतर : २०, एकूण : ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-५, २-२१, ३-४४, -४-९२, ५-१९२, ६-१९२, ७-२१३, ८-२२२, ९-२३२, १०-२४४. गोलंदाजी : धवल कुलकर्णी ९-०-३४-१, संदीप शर्मा १०-१-४६-२, ऋषी धवन १०-०-४९-४, कर्ण शर्मा १०-१-३२-१, अक्षर पटेल ९-०-५६-१, करुण नायर २-०-१२-०.
भारत अ धावा चेंडू ४ ६
मयंक झे. विलास गो. त्सोत्सोबे १३० १२२ १६ १
उन्मुक्त चंद पायचीत गो. एल्गर ९० ९४ ०८ २
मनीष पांडे नाबाद ०९ ०८ ०१ ०
करुण नायर नाबाद ०४ ०२ ०१ ०
अवांतर : १४, एकूण : ३७.४ षटकांत २ बाद २४७ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२१९, २-२४३. गोलंदाजी : त्सोत्सोबे ७.४-२-३२-१, विल्जोन ८-१-४५-०, एडी ली १०-०-७४-०, शेझी ४-०-२५-०, एल्गर ८-०-६९-१.
सामनावीर : मयंक अग्रवाल