आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची विजयी सलामी, पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेवर 4 धावांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‌‌झिम्बाब्वेविरुद्ध सलामीच्या एकदिवसीय सामन्यात शुक्रवारी चाैकार खेचताना भारतीय संघाचा शतकवीर अंबाती रायडू. - Divya Marathi
‌‌झिम्बाब्वेविरुद्ध सलामीच्या एकदिवसीय सामन्यात शुक्रवारी चाैकार खेचताना भारतीय संघाचा शतकवीर अंबाती रायडू.
हरारे - युवा खेळाडू अजिंक्य रहाणेने अटीतटीच्या रंगतदार सामन्यात यजमान झिम्बाब्वेला पराभूत करून अापण कणखर नेतृत्वासाठी कुशल असल्याचे शुक्रवारी सिद्ध केले. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत शानदार विजयी सलामी दिली. टीम इंडियाने सलामी सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा ४ धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी मिळवली. अाता मालिकेतील दुसरा सामना हरारेच्या मैदानावर रविवारी हाेणार अाहे.

स्टुअर्ट बिन्नी (२/५४) अाणि अक्षर पटेल (२/४१) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने शानदार विजयाची नाेंद केली. अंबाती रायडूच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २५५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात यजमान झिम्बाब्वेने घरच्या मैदानावर २५१ धावांत गाशा गुंडाळला. यजमानांसाठी चिगुम्बुराने दिलेली एकाकी झंुज व्यर्थ ठरली. त्याने नाबाद १०४ धावांची खेळी केली. मात्र, त्याला संघाचा पराभव टाळता अाला नाही.

धावांचा पाठलाग करणा-या यजमान टीमची निराशाजनक सुरुवात झाली. भुवनेश्वरने ४.५ षटकांत भारताला पहिला बळी मिळवून दिला. त्याने सलामीच्या चिभाभाला (३) रहाणेकरवी झेलबाद करून यजमानांना माेठा धक्का दिला. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नीने सिबंदाला (२०) बाद केले. मस्कदजा ३४ धावांची खेळी करून तंबूत परतला. त्याला अक्षर पटेलने झेलबाद केले. अखेर कर्णधार चिगुम्बुराने संघाचा डाव सावरला. त्याने एकाकी झंुज देत शतकी खेळी केली. मात्र, त्याला साथ देणा-या फलंदाजांना फार काळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही. त्याने १०१ चेंडूंत अाठ चाैकार व एका षटकाराच्या अाधारे नाबाद १०४ धावा काढल्या. याशिवाय त्याने क्रॅमरसाेबत ८६ धावांची भागीदारी केली.

बिन्नीची अष्टपैलू खेळी
स्टुअर्ट बिन्नीने झिम्बाब्वेविरुद्ध सलामीला अष्टपैलू खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. त्याने फलंदाजी व गाेलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी करत विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने नाबाद अर्धशतक ठाेकले. त्याने ७६ चेंडूंचा सामना करताना सहा चाैकार व दाेन षटकारांसह नाबाद ७७ धावा काढल्या. याशिवाय त्याने महत्त्वाचे दाेन बळी घेतले. त्याने दहा षटकांत ५४ धावा देत दाेन विकेट घेतल्या.

अंबाती रायडू-स्टुअर्ट बिन्नीची शानदार दीडशतकी भागीदारी
भारतीय संघाकडून अंबाती रायडू अाणि स्टुअर्ट बिन्नीने शानदार खेळी केली. या दाेघांनी सहाव्या गड्यासाठी १६० धावांची भागीदारी केली. यासह त्यांनी टीमला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. अंबातीने १३३ चेंडूंत १२ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे १२४ धावा काढल्या. तसेच बिन्नीने नाबाद ७७ धावांचे याेगदान दिले.

अजिंक्यची दमदार सुरुवात
भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीचा मुरली विजय (१) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे अाणि रायडूने दुस-या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. यात अजिंक्यने ४९ चेंंडूंत ३४ धावा काढल्या.