आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट काेहलीचे अाता वनडे मालिका विजयाचे टार्गेट, रविवारपासून मालिकेला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्काने काेलंबाेत घेतली काेहलीची भेट. - Divya Marathi
अनुष्काने काेलंबाेत घेतली काेहलीची भेट.
काेलंबाे- कसाेटी मालिकेतील एेतिहासिक विजयाने टीम इंडियाला श्रीलंकेच्या खेळपट्टीवर इतिहास रचता अाला. याच विजयाने फाॅर्मात असलेल्या भारतीय संघाला कसाेटीपाठाेपाठ अाता वनडे मालिका जिंकून देण्यासाठी कर्णधार विराट काेहली सज्ज झाला अाहे.
 
येत्या २० अाॅगस्टपासून भारत अाणि श्रीलंका यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. अाता वनडे मालिकाही टीम इंडियाला जिंकण्याच्या देण्याच्या इराद्याने विराट काेहली मैदानावर उतरणार अाहे. यासाठी अापण सक्षम अाणि प्रभावशाली असे डावपेच अाखणार अाहे. यातून श्रीलंकेच्या खेळपट्टीवरचे अापले निर्विवाद वर्चस्व अबाधित ठेवण्याचा त्याचा मानस अाहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वनडे मालिकेमध्ये अापले काैशल्य पणास लावणार अाहे.
   
नुकतीच भारतीय संघाने यजमान श्रीलंकेविरुद्ध तीन कसाेटी सामन्यांची मालिका ३-० ने अापल्या नावे केली. याशिवाय भारताला एेतिहासिक कामगिरीचा पल्लाही यशस्वीपणे गाठला. तसेच यजमान श्रीलंकेविरुद्धच्या सर्वाधिक विजयातही अाता भारताचे नाव अव्वल स्थानावर अाले अाहे.  यामध्ये भारताने अापल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकला मागे टाकले. काेहलीच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताला हे एेतिहासिक यश संपादन करता अाले. अाता हीच अाक्रमक नेतृत्वाची लय अागामी वनडे मालिकेतही कायम ठेवण्याच्या त्याचा प्रयत्न असेल.   

पुन्हा गॅलेवर विजयी सुरुवातीची संधी :   
येत्या २० अागस्ट राेजी गॅलेच्या मैदानावर मालिकेतील सलामीचा वनडे सामना रंगणार अाहे. याच मैदानावर अाता भारतीय संघाला अापल्या मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची संधी अाहे. यापूर्वी याच मैदानावर भारताने कसाेटी मालिका विजयाच्या माेहिमेला सुरुवात केली व ही माेहीम पल्लेकलवर यशस्वी केली.
 
काेहली-अनुष्काच्या भेटीत काेच शास्त्री
नव्याने टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पदभार स्वीकारलेल्या रवी शास्त्री यांच्या खास उपस्थितीची चर्चा रंगत अाहे. विराट काेहली अाणि खास मैत्रीण अनुष्का शर्मा याची भेट झाली. या भेटीदरम्यान प्रशिक्षक रवी शास्त्री हे उपस्थित हाेते. याप्रसंगी काढण्यात अालेल्या फाेटाेमध्ये शास्त्री हे काेहली अाणि अनुष्कासाेबत दिसत अाहेत. याशिवाय फाेटाेमध्ये काही श्रीलंकेतील चाहतेही हजर असल्याचे दिसते.
 
अनुष्काने काेलंबाेत घेतली काेहलीची भेट
एेतिहासिक विजयानंतर अाता टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीवर काैतुकाचा वर्षाव केला जात अाहे. यात त्याची खास मैत्रीण सिने अभिनेत्री अनुष्का शर्माच्या काैतुकाची भर पडली. यासाठी तिने श्रीलंकेत जाऊन काेहलीचे अभिनंदन केले.
 
पराभव जिव्हारी; नेतृत्वात बदल
घरच्या मैदानावर कसाेटी मालिकेतील पराभव यजमानांच्या चांगलाच जिव्हारी लागला अाहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या निवड समितीने अापल्या राष्ट्रीय टीमच्या नेतृत्वात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. मॅथ्यूजने गत महिन्यात नेतृत्व साेडले. अाता या नेतृत्वाचा पदभार युवा खेळाडू उपुल थरंगाकडे साेपवण्यात अाला. त्यामुळे यजमानांना अाता वनडे मालिकेत नव्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...