आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे मालिका : ५-० ने द. अाफ्रिकेकडून क्लीन स्वीप, ४६ वर्षांनंतर कांगारूंचा धुव्वा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केपटाऊन - दक्षिण अाफ्रिकेने अाॅस्ट्रेलियाविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका ५-० ने अापल्या नावे केली. तब्बल ४६ वर्षांनंतर मालिकेत अाॅस्ट्रेलियाचा सुपडासाफ झाला. यजमान टीमने मालिकेतील शेवटच्या अाणि पाचव्या वनडेत अापल्या घरच्या मैदानावर ३१ धावांनी अाॅस्ट्रेलियाचा पराभव केला. यासह चार दशकांनंतर प्रथमच अाॅस्ट्रेलियाला पाच वनडेंच्या मालिकेत एकही विजय मिळवता अाला नाही.
अाॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वाॅर्नर सामनावीर व अाफ्रिकेचा राेसाे हा मालिकावीरचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अाफ्रिका संघाने ८ बाद ३२७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने ४८.२ षटकांत अवघ्या २९६ धावांत गाशा गुंडाळला. अाॅस्ट्रेलियाकडून डेव्हिड वाॅर्नरने (१७३) केलेली दीड शतकी खेळी व्यर्थ ठरली. राेसाेच्या (१२२) शतकाच्या बळावर यजमान अाफ्रिकेने धावांचा डाेंगर रचला.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका : ८ बाद ३२७, ऑस्ट्रेलिया : सर्वबाद २९६.
बातम्या आणखी आहेत...