आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायपीएल आठ वर्षांत शिखरावरून तळाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शिखरावरून थेट तळात. बहुधा ही म्हण आयपीएलसाठीच तयार झाली आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या टी-२० क्रिकेट लीगने वेगाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. पैशांचा पाऊस इतका बरसला की ही स्पर्धा इंडियन पैसा लीग म्हटली जाऊ लागली. स्पर्धा वादग्रस्तही ठरली आणि अवघ्या ८ वर्षांत लीग तोंडघशी आदळली.

सर्वोच्च न्यायालयाचा मंगळवारचा निर्णय फक्त आयपीएलची पहिली चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स आणि सर्वाधिक यशस्वी संघ चेन्नई सुपरकिंग्जसाठी धक्का नाही, तर बीसीसीआयही या निर्णयाने हादरली आहे. २००७-०८ मध्ये भारतीय क्रिकेट चढउताराच्या मार्गावर होते. वनडे वर्ल्डकपच्या धक्क्यानंतर भारताला टी-२० चॅम्पियन बनवून धोनी ब्रिगेडने बऱ्यापैकी सांभाळले होते. मात्र, आयसीएल नावाच्या बंडखोर लीगने नाकीनऊ आणले. अशा अशा वेळी बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग लाँच केली. ललित मोदी याचे बॉस बनले. मोदीने या लीगशी उद्योजक आणि बॉलीवूडला जोडले. आयपीएल-२ चा कार्यक्रम निवडणुकीच्या तोंडावर आल्याने मोदीने ही लीग द. आफ्रिकेत हलवली. लीगचे यश सर्व जगाचे लक्ष वेधत होते. लक्ष सट्टेबाजांनीही खेचले. २०१३ मध्ये श्रीसंत, चंदिला आणि अंकित चव्हाण यांना सट्टेबाजीच्या आरोपात अटक झाली. सट्टेबाजीच्या जाळ्यात चेन्नई, राजस्थानचे मालक, अधिकारीही अडकले...प्रतिमा डागाळली.
पूर्ण बंदी हवी होती...
‘चेन्नई अाणि राजस्थान राॅयल्स टीमला कमी शिक्षा मिळाली. या दाेन्ही संघांवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी. क्रिकेटमधील माफियांना बाहेर काढण्याची अाणि क्रिकेटला चालना देण्याची अाता वेळ अाली अाहे. अाता ही एक नवीन सुरुवात अाहे. - ललित माेदी

निर्णयाने दोन्ही संघांच्या खेळाडूंना धक्का बसला. बीसीसीआयकडे दोन नव्या टीमसाठी आठ महिन्यांचा वेळ आहे. पुढच्या आयपीएलमध्ये ८ संघ असतील. -सुनील गावसकर

‘चेन्नई अाणि राजस्थानच्या संघांना यापेक्षा अधिक शिक्षा मिळायला हवी. भविष्यात बीसीसीअायसमाेर अनेक माेठी अाव्हाने येतील.’ - बिशनसिंग बेदी

निर्णय चांगला आहे. त्या १३ खेळाडूंचे काय, ज्यांची नावे मुदगल समितीने दिली होती. मी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करेन. - आदित्य वर्मा.

वर्ल्ड मीडियाच्या नजरेतून
अनेक प्रकरणे बाहेर येतील
अायपीएलचे दाेन संघ निलंबित झाले. याचा परिणाम काय हाेईल, यांचा अंदाज घ्यायला वेळ लागेल. मात्र, या निर्णयामुळे क्रिकेटमधील काेणताही भाग सुटणार नाही. अाता हे स्पष्ट झाले की, भारतीय क्रिकेटचे श्रीनिवासनसारखे जे जुने कर्तेधर्ते हाेते, त्यांच्यासमाेरील अडचणी कमी हाेण्याएेवजी अधिकच वाढत जाणार अाहेत. श्रीनिवास, राज कुंद्रा अाणि मय्यपन यांच्यासारख्या लाेकांचे जे व्हायचे ते अाता झाले. मात्र, अाता याचा परिणाम काॅर्पाेरेट स्पाॅन्सर्स, खेळाडू अाणि अायपीएलच्या स्वरूपावर पडणार अाहे. तसेही अायपीएलमध्ये एवढा पैसा लागलेला अाहे की त्याला अाता स्थगित वा रद्द केले जाऊ शकत नाही. मात्र, याचे स्वरूप अागामी दाेन वर्षांत वेगळे असेल. याची प्रतिष्ठाही घटेल अाणि कमाई कमी हाेईल. अाता या निर्णयाला शेवट नव्हे, तर सुरुवात मानली पाहिजे. अाता अनेक प्रकरणे उघडकीस येतील.
डॉन (पाकिस्तान) श्रीनिंच्या जावयावर बंदी
सर्वाेच्च न्यायालयाच्या वतीने फिक्सिंगच्या चाैकशीसाठी नियुक्त केलेल्या पॅनलने चेन्नई अाणि राजस्थानवर बंदीची कारवाई केली. या दाेन्ही टीमचे अधिकारीही दाेषी अाढळले अाहेत. अायसीसीचे चेअरमन श्रीनिवासन यांच्या जावयावरही बंदीची कारवाई झाली. या निर्णयामुळे धाेनी, रैना, वाॅटसनसारख्या माेठ्या खेळाडूंना अार्थिक अडचणीची झळ साेसावी लागणार अाहे.
मिरर (इंग्लंड) अायपीएल : २ टीमवर बंदी
मॅच फिक्सिंगप्रकरणी अायपीएल टीम चेन्नई सुपरकिंग्ज अाणि राजस्थान राॅयल्सवर दाेन वर्षांची बंदी घालण्यात अाली. या दाेन्ही टीम मॅच फिक्सिंगच्या चाैकशीमध्ये अवैध सट्टेबाजीप्रकरणी दाेषी अाढळल्या अाहेत. दाेन्ही संघांनी मिळून अायपीएल अाठमध्ये तीन स्पर्धा जिंकल्या अाहेत. या संघांकडून इंग्लंडच्या कलिंगवुड, फ्लिंटाॅफसारखे खेळाडू खेळले अाहेत.
पुढील स्लाइडमध्ये, सोशल मीडियाच्याच्या नजरेतून