आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL:बांगलादेशने घरच्या मैदानावर सलामी कसाेटीत केला अाॅस्ट्रेलियाचा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका-जागतिक कसाेटी क्रमवारीत तळात असलेल्या बांगलादेश टीमने अापल्या घरच्या मैदानावर बलाढ्य अाॅस्ट्रेलियाला धूळ चारली. यजमानांनी सलामीच्या कसाेटीत २० धावांनी विजय संपादन केला.
 
 
बांगलादेशने चाैथ्या दिवशी कसाेटीत जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या अाॅस्ट्रेलियाला धूळ चारण्याचा पराक्रम गाजवला. यामुळे सध्या बांगलादेशच्या टीमवर काैतुकाचा वर्षाव हाेत अाहे. दुसरीकडे या लाजिरवाण्या पराभवामुळे सध्या अाॅस्ट्रेलियन कसाेटी टीमला टीकेला सामाेरे जावे लागत अाहे. अाॅस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांकडून अापल्या राष्ट्रीय टीमवर माेठ्या प्रमाणात टीका केली जात अाहे. त्यामुळे अाॅस्ट्रेलिया टीम चांगलीच अडचणीत सापडली अाहे. 
 
 
पाहुणे तुपाशी, मात्र यजमान उपाशी 
बांगलादेश दाैऱ्यावर अालेल्या अाॅस्ट्रेलियन टीममधील खेळाडूंना घसघशीत मानधन वाढ मिळाली अाहे. त्यामुळे पाहुणे टीम तुपाशी अाहेत. त्यांना अाठवड्याला २६,००० अाॅस्ट्रेलियन डाॅलरचे मानधन दिले जाते. दुसरीकडे यजमानांना अाठवड्याला पाचशे अाॅस्ट्रेलियन डाॅलरचे मानधन मिळत अाहे.
बातम्या आणखी आहेत...