आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला केले 3-0 ने क्लीन स्विप, मालिकेतील अखेरच्या वनडेत 117 धावांनी हरवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे (१५६) सलग दुसरे शतक आणि मिशेल स्टार्कच्या (३/३४) घातक गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या वनडेत ११७ धावांनी हरवले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकून न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिले. वॉर्नरने या वेळी दुहेरी यश मिळवले. तो सामनावीर आणि मालिकावीरही ठरला.

वॉर्नरने आपल्या करिअरमध्ये ११ वे शतक ठोकले. वॉर्नरने १२८ चेंडूंत ४ षटकार, १३ चौकारांसह ही खेळी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ५ बाद २६४ धावा काढल्या. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा ३६.१ षटकांत १४७ धावांत खुर्दा उडाला. सलामीवीर मार्टिन गुप्तिलने ३४ धावा काढल्या. त्याच्याशिवाय लँथमने २८ धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया ८ बाद २६४. न्यूझीलंड : १४७
बातम्या आणखी आहेत...