आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पी. सिंधू 37 मिनिटांत उपांत्य फेरीत दाखल; हाँगकाँग अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलून- रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी अापला दबदबा कायम ठेवताना हाँगकाँग अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीचा उपांत्यपूर्व सामना अवघ्या ३७ मिनिटांमध्ये जिंकला. तिने अंतिम अाठमध्ये जपानच्या अकाने यामागुुचीवर सहज मात केली. दुसऱ्या मानांकित सिंधूने २१-१२, २१-१९ अशा फरकाने विजयश्री खेचून अाणली. यासह तिला अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. सायनाच्या पराभवानंतर अाता भारतीय संघाच्या पदकाची मदार सिंधूकडून अाहे. त्यामुळे तिच्यावर सर्वांची नजर असेल.   


पराभवाचा वचपा : दुसऱ्या मानांकित सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीला गत अाठवड्यातील पराभवाची परतफेड केली. अकानेने फ्रेंच अाेपनच्या अंतिम चारमध्ये सिंधूला पराभूत केले हाेतेे. मात्र, याच पराभवाचा वचपा काढताना सिंधूने अाता जपानच्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला.   


रत्नाचाेक उपांत्य  फेरीत

सहाव्या मानांकित रत्नाचाेक इंतानाेनने महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. तिने अंतिम अाठच्या सामन्यात मिचाल्ले लीवर मात केली. तिने २१-१४, २१-१६ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने अवघ्या ३९ मिनिटांमध्ये पुढची फेरी गाठली. यासाठी तिला दुसऱ्या गेमवर शर्थीची झुंज द्यावी लागली.

बातम्या आणखी आहेत...