आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Cricketer Shahid Afridis Daughters Death News Are False

आफ्रिदीच्या मुलीच्या मृत्यूची बातमी झाली व्हायरल, वाचा काय आहे या मागील सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची : पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदी नेहमिच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. तो गेल्या टी-20 विश्वचषका पाकिस्तानची खराब कामगिरी आणि भारताची केलेली स्तूती यांमुळे तो वादात अडकला होता. पण गल्या दोन-तीन दिवसांपासून त्याची मुलगी असमारा हिचा मृत्यू झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वाईट बातमीमुळे तो चर्चेत आहे.

एक फोटो सोशल मिडियावर व्हयरल होत आहे. हा फोटो अफ्रिदीच्या मुलीचा असल्याचाही दावा करण्यात येत आहे. या फोटोत एका मुलीला पांढऱ्या कपड्याने गुढाळलेले असून गुलाबाच्या पाकळ्या तिच्या शरीरावर पसरवलेल्या दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी अफ्रिदीने असमारासोबतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. यात असमारा रुग्णालयात असल्याचे दिसेत होते. हा फोटो शेअर करताना अफ्रिदीने ‘गेट वेल सून असमारा, आमीन’ असेही लिहिले होते.
मात्र आता हा फोटो व्हायरल झाल्याने असमाराच्या मृत्यूची चांगलीच चर्चा होत आहे. मात्र आता हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आफ्रिदीने सोमवारी सायंकाळी एक फोटो शेअर केला, हा फोटो पाहून असमारा अगदी सुरक्षित असल्याचे समजते. आता मंगळवारी सकाळपासून असमारा सुरक्षित असल्याच्या पोस्टदेखील व्हायरल होत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हायरल झालेला मेसेज, त्याला आलेल्या कमेंट्स.... आणि आफ्रिदीने शेअर केलेले फोटोज...