आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) त्यांचा सात फुट उंच वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानला पाकिस्तान क्रिकेट लीगशी (पीसीबी) स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबित केले आहे. पाकिस्तान टी-२० क्रिकेट लीग दरम्यान समोर आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मो. इरफानला मंगळवारी निलंबित करण्यात आले. त्याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत. 

याबाबत पीसीबीने म्हटले की, “आमची चौकशी सुरू आहे. इरफानला भ्रष्टाचार विरोधी संहितेअंतर्गंत अस्थायी रूपात निलंबित करण्यात आले असून, आरोप निश्चित करून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.’ मोहम्मद इरफानच्या आधी शार्जिल खान, खालिद लतिफ आणि नासेर जमशेद यांना क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निलंबित करण्यात आले आहे.
  
पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने पाकिस्तानचे तीन खेळाडू मोहम्मइ इरफान, जुल्फिकार बाबर, शाहजेब हसन यांचीसुद्धा पाकिस्तान सुपर लीगमध्ये चर्चेत असलेल्या भ्रष्टाचारासंबंधी चौकशी केली. चौकशीत जुल्फिकार बाबर आणि शाहजेब हसन दोषी अाढळले नाही. शार्जिल, खालिद आणि मो. इरफान हे तिघे पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाकडून खेळले. हे प्रकरण समोर आल्यानंतर इस्लामाबाद संघ व्यवस्थापनाने इरफानला पुढच्या सामन्यात खेळू िदले नाही. 

मो. इरफानचे करिअर 
डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने आतापर्यंत ४ कसोटी, ६० वनडे आणि २० टी-२० सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विश्व क्रिकेटमधील सर्वाधिक उंच खेळाडूंत त्याचा समावेश अाहे. इरफानच्या नावे कसोटीत १०, वनडे ८३ आणि टी-२० मध्ये १५ विकेट आहेत. 
बातम्या आणखी आहेत...