आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानी फलंदाजांची सुपरहिट बॅटिंग, T-20 मध्‍ये बनवला जागतिक विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान क्रिकेट टीमने श्रीलंका दौ-यावर जोरदार कामगिरीचे दर्शन घडवले. कसोटी, एकदिवशीय आणि T-20 या तिन्‍ही सीरीजवर संघाने आपले नाव कोरले आहे. श्रीलंकेला त्‍यांच्‍या मायदेशी हरवून पाकिस्‍तानने हा दौरा यशस्‍वी केला आहे. शेवटच्‍या T-20 मध्‍ये एका विकेटने जोरदार विजय पाकिस्‍तानला आपल्‍या पदरात पाडून घेता आला आहे. या सामन्‍यांमध्‍ये पाकिस्‍तानने काही रेकॉर्डही आपल्‍या नावावर केले आहे. फलंदाज अनवर अलीने 9 व्‍या क्रमांकावर बॅटींग करून रेकॉर्ड बनवले आहे.
अनवरचे रेकार्ड
पाकिस्तानचा ऑलराउंडर अनवर अली याने 35 चेंडूत 66 धावा जमवल्‍या आहेत. 22 चेंडूत त्‍याने तीन चौकार आणि 4 छटकार झोडून हे रेकॉर्ड केले आहे. 9 व्‍या क्रमांकावर खेळून सर्वाधिक धावा काढण्‍याचा जागतिक रेकॉर्डही त्‍याच्‍या नाववर झाला आहे. या आधी हे रेकॉर्ड पाकिस्तानचा सोहेल तनवीर याच्‍या नावावर होते. तिन्‍ही सिरीजमध्‍ये पाकिस्तानने दमदार कामगिरी केली आहे. पहिला वनडे पाकिस्तानने जिंकला, त्‍यानंतरचा श्रीलंकेने. पुढचे दोन वनडे पाठोपाठ पाकिस्‍तानने जिंकले. नंतर दोन T-20 मॅचेसही पाकिस्‍तानची आपल्‍या खिशात घेतल्‍या. divyamarathi.com या पॅकेजमधून पाकिस्‍तान - श्रीलंका यांच्‍यात झालेल्‍या शेवटच्‍या T-20 मधील रेकॉर्ड आपल्‍यासमोर मांडत आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, पाकिस्‍तानचा विक्रम..