आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Cricketer Shoaib Akhtar\'s Many Controversies

...जेव्हा \'बॅड बॉय\' शोएब अख्तरच्या या PHOTOS मुळे उडाली होती खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाच्या एका बारमध्ये पार्टी करताना शोएब अख्तर. - Divya Marathi
ऑस्ट्रेलियाच्या एका बारमध्ये पार्टी करताना शोएब अख्तर.
मैदानावर आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर 13 ऑगस्टला आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेट जगतीत विवादाचे दुसरे नाव म्हणजे शोएब अख्तर. सध्या कॉमेंट्रीशी संबंधित असलेल्या शोएबची पाठ मैदानाबाहेरदेखील कधी वाद-विवादांनी सोडली नाही. एवढेच काय? पण, त्याच्यावर रेपचासुद्धा आरोप झाला होता. ज्यामुळे क्रिकेट जगतात चांगलाच हंगामा झाला होता.
ऑस्ट्रेलियाच्या बारमध्ये अाढळला होता शोएब:
पाकिस्तानचा संघ 2005 मध्ये ऑस्ट्रलियाच्या दैर्‍यावर आला होता. तेव्हा रावळपिंडी एक्सप्रेसच्या नावाने प्रिसद्ध असलेला शोएब अख्तर ऑस्ट्रेलियातील एका बारमध्ये पार्टी करताना आढळला होता. यावेळी शोएबला टूर अर्धावर सोडून वापस बोलावण्यात आले होते. त्याच्या कडून दंडही वसूल करण्यात आला होता. एवढेच नाही तर, त्याच्यावर सहकार्‍यांशी गैरवर्तन केल्याचा ठपकाही ठेवण्या आला होता. या पब प्रकरणानंतरच शोएबवर रेपचा आरोपही झाला. याचे फोटोजही नंतर समोर आले होते.
पाकिस्तानी अॅक्ट्रेसने केले होते आरोपः
पाकिस्तानात प्ले बॉय म्हटल्या जाणार्‍या शोएब अख्तरचे नाव पाकिस्तानी अॅक्ट्रेस विना मलिक हिच्याशी जोडले गेले होते. विनाचे म्हणने हेते की, शोएब आणि तिच्यात अफेअर होते. मात्र शोएब या बबतीत गंभीर नव्हता. नंतर विना असेही बोलली होती की, शोएबने तिच्या कझीनलाही प्रपोज केले होते. या शिवय 2012मध्ये आणखी एका पाकिस्तानी अॅक्ट्रेस मीराने शोएबसह अफेअर असल्याचा दावा केला होता. मात्र असे असले तरी, शोएबने या दोनही संबंधांना फेटाळून लावले होते.
विवादांशी कायमचे नातेः
पाकिस्तानचा हा फास्टर बॉलर विवादंचा शहेंशाह राहिला आहे. तो क्रिकेटच्या मैदानावर असो वा मैदाना बाहेर, त्याच्या पाठीशी अनेक विवाद असतातच. शोएब कधी ड्रग्ज, कधी फिक्सिंग, कधी गैरवर्तन तर कधी अफेयर यांच्या बाबतीत नेहमीच चर्चेत राहतो. मैदानावर विरोधी टीमच्या खेळाडूशी भांडणांपासू ते सहकारी खेळाडूंशी मतभेदांपर्यंतचे आरोप त्याच्यावर झालेले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, शोएब अख्तरशी संबंधित काही फोटोज...