आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलिकचा शतकी दणका; पाकिस्तानचा झिम्बाब्वेवर ४१ धावांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहाेर - तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर शाेएब मलिकने झळकावलेल्या शतकाच्या बळावर पाकिस्तानच्या संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर ४१ धावा राखून विजय मिळवला.
दाेन वर्षांनंतर पाककडून एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या शाेएब मलिकने या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. त्याने अवघ्या ७६ चेंडूंमध्ये ११२ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यात १२ चाैकार अाणि २ षटकारांचाही समावेश हाेता. त्यामुळेच पाकला निर्धारित ५० षटकांमध्ये ३ बाद ३७५ धावांची विक्रमी धावसंख्या उभारता अाली. झिम्बाब्वेच्या संघानेही ५० षटकांत ५ बळी गमावून ३३४ धावा केल्या. त्यामुळे पाकला हा सामना ४० धावांनी जिंकणे शक्य झाले अाहे.

चिगुम्बुराचे प्रत्युत्तर
पाकच्या ३७५ धावा झाल्याने ते हा सामना सहजपणे जिंकतील, असेच सर्वांना वाटत हाेते. मात्र, झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टन चिगुम्बुराने अवघ्या ९५ चेंडूंमध्ये तुफानी ११७ धावांची खेळी केल्याने त्यांच्या संघाच्या अाशा जिवंत झाल्या हाेत्या. मात्र, उत्तराेत्तर वाढत गेलेल्या अपेक्षित रनरेटमुळे झिम्बाब्वेला हे लक्ष्य गाठणे शक्य झाले नाही, परंतु त्यांनीदेखील सव्वातीनशेचा टप्पा अाेलांडल्याने एकाच सामन्यात तब्बल ७०० हून अधिक धावा कुटल्या गेल्या.

विक्रमी धावसंख्या
पाकचा झिम्बाब्वेविरुद्ध हा विजय त्यांना अजून एका विक्रमाकडे घेऊन गेला. पाकने यापूर्वी २००७ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ३४९ धावा उभारल्या हाेत्या. मात्र, या सामन्यात पाकने ३७५ धावा उभारल्याने त्यांची झिम्बाब्वेविरुद्धची ही सर्वाेच्च धावसंख्या ठरली अाहे. शाेएब मलिकने सलामीला हाफिजसाेबत (८६) तब्बल १७० धावांची भागीदारी केली. त्यानंतर अालेल्या अजहर अलीने (७९ ) शाेएबला चांगली साथ दिल्यानेच पाकची धावसंख्या साडेतीनशेच्या पल्याड पाेहाेचू शकली. दरम्यान, यापुढचे दाेन्ही सामने शुक्रवारी अाणि रविवारी लाहाेरमध्येच रंगणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...