स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीत पुन्हा भारत Vs पाक असा एेतिहासिक महासामना होत आहे. पण याआधीच टीम इंडियाला मोठा समर्थक भेटला आहे. त्याने सामन्यात भारताच्या विजयाची भविष्यवाणी केली आहे. हा चाहता म्हणजे पाकिस्तानात 'चाचा शिकागो' या नावाने प्रसिद्ध असलेले मोहंमद बशीर आहेत. ते नेहमी भारत-पाक सामन्यात त्यांच्या टीमला सपोर्ट करताना दिसतात.
यामुळे बदलले बशीर यांचे मन...
- चाचा शिकागो म्हणतात, 'या वेळी भारतीय टीम पाकला हरवणार आहे आणि ट्रॉफीही जिंकणार आहे. भारत-पाक संघात आता तुलनाच केली जाऊ शकत नाही. भारतीय संघ खूप पुढे निघून गेला आहे.'
- बशीर म्हणाले, मी आताही पाकिस्तानवर प्रेम करतो. परंतु सामन्यात भारतच माझा फेव्हरेट आहे. ते आधी पाकिस्तानला सपोर्ट करत होते, पण आता त्यांना भारतच जिंकावा असे वाटते.
- ते म्हणाले की, भारतात 2011च्या मोहाली येथील सामन्यांदरम्यान मला जे प्रेम मिळाले, त्याला मी विसरू नाही शकत. एक वेळ तर अशी आली की, मी पाकऐवजी भारतातच जास्त जायला लागलो. पाकिस्तानच्या तुलनेत मी भारतात जास्त सुरक्षितता अनुभवतो.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा चाचा शिकागोचे फोटोज आणि कसे मिळाले त्यांना हे नाव?..