आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसोटी/तिसरा दिवस : पाकची दमदार फलंदाजी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी श्रीलंकेला पहिल्या डावात ३१५ धावांवर रोखल्यानंतर पाहुण्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर अहेमद शहजाद (६९) आणि अझहर अली (नाबाद ६४) यांनी अर्धशतके ठोकून पाकला संकटातून बाहेर काढले. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी पाकने २ बाद १७१ धावा काढल्या होत्या. पावसाने हजेरी लावल्यामुळे जवळपास ३० षटकांचा खेळ झाला नाही.

पहिल्या डावात पाकचा १३८ धावांत खुर्दा उडाला होता. यानंतर लंकेने पहिल्या डावात ३१५ धावा काढून १७७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र, दुसर्‍या डावात पाकने चांगली फलंदाजी केली. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. मो. हाफिज अवघ्या ८ धावा काढून बाद झाला. त्याला मॅथ्यूजने बाद केले. त्यानंतर अहमद शहजाद आणि अजहर अलीने शानदार अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. शहजादने १५४ चेंडूंत १ षटकार, ४ चौकारासह ६९ धावा केल्या.

शहजाद-अलीची शतकी भागीदारी
पाकचा शहजाद आणि तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या अजहर अली या जोडीने दुसर्‍या गड्यासाठी २६४ चेंडूंचा सामना करत १२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यात अजहर अलीने १५२ चेंडूंत ३ चौकार मारताना नाबाद ६४ धावा जोडल्या. त्याच्यासेाबत अनुभवी फलंदाज युनूस खान २३ धावांवर खेळत आहे.

यासिर शहाच्या ६ विकेट
कालच्या ९ बाद ३०४ धावांच्या पुढे खेळताना श्रीलंकेने केवळ ११ धावांची भर घातली. त्यांचा डाव ३१५ धावांवर आटोपला. हेराथ १८ धावांवर नाबाद राहिला. पाकच्या यासिर शहाने ६ गडी बाद केले.
बातम्या आणखी आहेत...