आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडीजला पाकचा ३-० ने क्लीन स्वीप! इमाद वसीम ‘मॅन आॅफ सिरीज’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुधाबी - पाकिस्ताननेटी-२० मालिकेत शानदार कामगिरी करताना २०१६ चा वर्ल्डकप विजेती टीम वेस्ट इंडीजला यूएईत झालेल्या मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप दिला. पाकिस्तानने वेस्ट इंडीजविरुद्ध तिसरा टी-२० सामना विकेटने जिंकून ही मालिका ३-० ने जिंकली. पाकने टी-२० च्या इतिहासात प्रथमच कोणत्याही संघाला व्हाइट वॉश दिला. मालिकेतील 3 सामन्यांत 9 विकेट घेणारा इमाद वसीम ‘मॅन ऑफ सिरीज’चा मानकरी ठरला.
तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात पाकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पाक गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करताना वेस्ट इंडीजला अवघ्या 5 बाद 103 धावांवर रोखले. यानंतर पाकने १५.१ षटकांत विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. पाकचा युवा फिरकीपटू इमामने दमदार गोलंदाजी करताना विंडीजचे कंबरडे मोडले. त्याने षटकांत २१ धावा देत गडी बाद केले. वेस्ट इंडीजकडून मधल्या फळीत मार्लोन सॅॅम्युअल्सने ५९ चेंडूंचा सामना करताना नाबाद ४२ धावा तर केरोन पोलार्डने १७ चेंडूंत नाबाद १६ धावा काढल्या.

धावांचा पाठलाग करताना पाकने षटकांत ३० धावा काढल्या. पाककडून शार्जिल खान ११ तर खलीद लतीफ २१ धावा काढून बाद झाले. विंडीजकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या विल्यम्सने षटकांत १५ धावांत गडी बाद केले. पाककडून शोएब मलिकने ३४ चेंडूंत नाबाद ४३ धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले.
पायचित अपिल करताना इमाद वसीम.
संक्षिप्त धावफलक वेस्टइंडीज : बाद १०३. पाकिस्तान : १५.१ षटकांत बाद १०८ धावा.
बातम्या आणखी आहेत...