आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडक सुरक्षेत पीसीएलचे यशस्वी फायनल!, अतिरेकी हल्ल्यात एका महिन्यात 130 जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामन्याआधी पॅराट्रूपरने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. - Divya Marathi
सामन्याआधी पॅराट्रूपरने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
लाहोर - पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) दुसरे सत्र संपले आहे. या सत्राचे फायनल रविवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झाला. या सामन्याकडे सर्व जगाचे लक्ष होते. कारण, तब्बल आठ वर्षांनी प्रथमच मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पाकिस्तानात कोणत्याही सामन्यात सहभाग घेतला होता. पाकमध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना लाहोर येथे २००९ मध्ये झाला होता. त्यावेळी श्रीलंकेच्या संघाला घेऊन जाणा ऱ्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यानंतर २०१५ मध्ये झिम्बाब्वेची टीम पाकिस्तानात गेली होती. तेव्हा सुद्धा स्टेडियमच्यास जवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात २ सुरक्षारक्षक ठार झाले होते. तेव्हापासून पाकिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. फायनल देशात आयोजन करण्याबाबत पाक सरकार द्विधा मनस्थितीत होती. गत महिनाभरात अतिरेकी हल्ल्यात १३० लोक ठार झाले हाेते.   

स्टेडियमकडे जाणारे मार्ग  होते बंद :  
पाकिस्तानात खेळाडूंची सुरक्षा हेच मोठे आव्हान होते. यामुळे शासन स्तरावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. खेळाडूंना विशेष बुलेटप्रूफ बसमधून हॉटेल ते स्टेडियमपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. स्टेडियमच्या ५ किमी आधीच चौकशी करून प्रेक्षकांना स्टेडियमपर्यंत पाठवण्यात येत होते. स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावरील रेस्ट्राॅरंट बंद करण्यात आले. सुरक्षा व्यवस्थेत १०,००० जवान आणि विशेष प्रशिक्षित कुत्रेसुद्धा तैनात करण्याात आले होते. गद्दाफी स्टेडियमच्या जवळ नॅशनल हॉकी स्टेडियमवर २५ खाटांचे तात्पूरते रुग्णालय बनवण्यात आले. सामन्याच्या आधी पॅराट्रूपरने स्टेडियममध्ये उतरून सुरक्षेची पाहणी केली.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, लोकांनी म्हटले, पाक विजयी... 
बातम्या आणखी आहेत...