आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचा लंकेवर एेतिहासिक कसोटी विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लेकल - तिस-या कसोटीत श्रीलंकेवर ७ गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवत पाकिस्तानने तीन कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. अखेरच्या तिस-या कसोटीत शतकवीर शान मसूद आणि युनूस खान हीरो ठरले. युनूस खान मालिकावीर ठरला, तर यासिर शहाने मालिकावीर पुरस्कार पटकावला. यासिरने मालिकेत एकूण २४ बळी घेतले. श्रीलंकेने पहिल्या डावात २७८ आणि दुस-या डावात ३१३ धावा काढल्या पाकिस्तानने पहिल्या डावात २१५ आणि दुस-या डावात ३ बाद ३८२ धावा उभारल्या.

विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकने २ बाद २३० अशी चांगली सुरुवात केली. पाचव्या दिवशी सकाळी युनूस खानने आपली लय कायम ठेवत नाबाद १७१ धावा ठोकून पाकला विजय मिळवून दिला. कालचा नाबाद फलंदाज सलामीवीर शान मसूद १२५ धावा काढून बाद झाला. त्याने २३३ चेंडूंत १ षटकार आणि ११ चौकार ठोकले. त्यानंतर युनूस खान आणि कर्णधार मिसबाह-उल-हकने (५९) नाबाद राहून पाकचा विजय साजरा केला.

पाकचा सर्वात अनुभवी फलंदाज युनूस खानने शतकी खेळी करत संघाला कसोटीसह मालिका विजय मिळवून दिला. युनूसने २७१ चेंडूंत १८ चौकारांसह नाबाद १७१ धावा चोपल्या. चौथ्या डावातील हे त्याचे पाचवे शतक ठरले. याबाबत त्याने सुनील गावसकच्या ४ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले. कर्णधार मिसबाह उल हकने १०३ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ५९ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून प्रसाद, लकमल आणि कुशलने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

क्रमवारीत सुधारणा
श्रीलंकेविरुद्ध तिसरी कसोटी जिंकल्यानंतर पाकिस्तानने कसोटी क्रमवारीत तिस-या स्थानावर धडक मारली. पाकने तीन स्थानांनी प्रगती केली. मालिका विजयामुळे ४ गुणांचा फायदा होत पाकिस्तानचे आता १०१ गुण झाले. श्रीलंका ९२ गुणांसह सातव्या स्थानावर कायम आहे. आफ्रिका १३० गुणांसह पहिल्या, तर १११ गुणांसह ऑस्ट्रेलिया दुस-या स्थानावर आहे. भारत-इंग्लंड ९७ गुणांसह अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी आहेत.

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव सर्वबाद २७८ धावा आणि दुसरा डाव ३१३ धावा. पाकिस्तान पहिला डाव २१५ धावा आणि दुसरा डाव ३ बाद ३८२ धावा.