आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी क्रिकेटर्स \'सैराट\', इंग्लंडला डिवचण्यासाठी पुन्हा केली ही \'हरकत\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी क्रिकेटर सोहेल खानने तिस-या कसोटीत मॅचच्या पहिल्या दिवशी 96 धावा देत 5 विकेट घेतल्या. - Divya Marathi
पाकिस्तानी क्रिकेटर सोहेल खानने तिस-या कसोटीत मॅचच्या पहिल्या दिवशी 96 धावा देत 5 विकेट घेतल्या.
एजबस्टन- इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरु झालेल्या तिस-या कसोटीत पहिल्या दिवशी यजमान इंग्लंड टीम 297 धावांत बाद झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानकडून सोहेल खानने 5 विकेट घेऊन इंग्लंडची अवस्था खराब करून टाकली. असा राहिला पहिला दिवस....
- पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने टॉस जिंकून प्रथम फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानी बॉलर्सने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला.
- इंग्लिश टीमला पहिला झटका 10 व्या षटकातच लागला. जेव्हा सोहेलने हेल्सला (17) बाद केले.
- यानंतर इंग्लंडच्या विकेट थोड्या थोड्या अंतराने पडत गेल्या. इंग्लंडचा पहिला डाव 86 षटकात 297 धावांवर आटोपला.
- इंग्लंडकडून गॅरी बॅलन्स (70) आणि मोईन अली (63) हायस्ट स्कोरर राहिले.
- पाकिस्तानकडून सोहेल खानने 5, मोहम्मद आमिरने 2, राहत अलीने 2 आणि यासिर शाहने 1 विकेट घेतली.
अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन-
- मॅचमध्ये 5 विकेट घेणा-या सोहेल खानने आपला आनंद खूप खास अंदाजात सेलिब्रेट केला.
- त्याने मैदानावर सलग 10 पुशअप्स मारून आपले यश साजरे केले.
- या दोन्ही संघात या मालिकेदरम्यान असे अनेक प्रसंग पाहायला मिळाले आहेत.
- दोन्ही संघादरम्यान लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यान मिसबाहने शतक ठोकल्यानंतर अशाच पद्धतीने पुशअप्स मारून आपला 'दम' दाखविला होता.
- त्याने पव्हेलियनकडे पागत सलग 10 पुशअप्स मारून लॉर्डसवरील स्पेशल शतक साजरे केले होते.
- यानंतर जेव्हा पाकिस्तान टीमने लॉर्ड्स टेस्ट जिंकली त्यावेळी संपूर्ण टीमने भर मैदानात पुशअप्स मारले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पाकिस्तानी प्लेयर्स कसे सलग पुशअप्स मारत करतात सेलिब्रेट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...