आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAKvsSL - पाकिस्‍तानच्‍या विजयात हफिजची दमदार कामगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्‍या विजयी संघाने सामन्‍यानंतर जल्‍लोष केला. - Divya Marathi
पाकिस्तानच्‍या विजयी संघाने सामन्‍यानंतर जल्‍लोष केला.
पाकिस्‍तानच्‍ाा मोहंमद हफीज याच्‍या सर्वंकश खेळीमुळे एकदिवसीय सामन्‍यात श्रीलंकेला सहा विकेट्सने हार पत्‍कारावी लागली. पाकिस्‍तानातील रांगिनी इंटरनॅशनल स्‍टेडियमवर शनिवारी झालेल्‍या वनडे सामन्‍यात श्रीलंकेने दिलेल्‍या 256 धावांचे लक्ष पाकिस्तानने 45.2 छटकांमध्‍ये पूर्ण केले. चार गडी गमावून पाकिस्‍तानने हा विजय मिळवला.
103 धावा काढणा-या हफीजने 95 चेंडूंमध्‍ये 10 चौकार आणि 4 छटकार लगावत दमदार फलंदाजीचे दर्शन घडवले. त्‍याने चार गडी बादही केले. शोएब मलिकने नाबाद 55 धावा काढल्‍या. मोहम्मद रिजवान 20 धावा काढून नॉट आऊट राहिला. त्‍याअाधी दिनेश चांडीमलने नॉट आऊट 65 धावा काढल्‍या. टॉस हारल्‍यानंतर यजमान संघाने 50 छटकांमध्‍ये 255 धावा जमवल्‍या. चांडीमलने 68 चेंडूंमध्‍ये पाच चौकार आणि एक छटकार लगावला.