आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तान विजयी, वेस्ट इंडीजवर ५९ धावांनी मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारजा - पाकिस्तानने बाबर अाझमच्या (१२३) शतकापाठाेपाठ वहाब रियाझच्या (२/४८) धारदार गोलंदाजीच्या बळावर दुसऱ्या वनडेत विंडीजला धूळ चारली. पाकने ५९ धावांनी सामना जिंकला. यासह पाकने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. विंडीजचा हा सलग दुसरा पराभव ठरला. पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या विंडीजला टी-२० पाठोपाठ अाता पाकविरुद्ध वनडे मालिकाही गमावावी लागली. मालिकेतील शेवटचा अाणि तिसरा वनडे बुधवारी अबुधाबीत रंगणार अाहे.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांमध्ये ५ गड्यांच्या मोबदल्यात ३३७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजला ७ गडी गमावून २७८ धावांपर्यंत मजल मारता अाली.

वेस्ट इंडीजकडून ब्राव्होने एकाकी झुंज देताना सर्वाधिक ६१ धावांचे योगदान दिले. तसेच सॅम्युअल्सने (५७) अर्धशतक ठाेकले. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता अाला नाही. रामदीन (३४), पोलार्ड (२२), हाेल्डर (नाबाद ३१) यांचेही प्रयत्न अपुरे ठरले. पाकच्या वसीम (१/६२), अामिर (१/४९) अाणि वहाब (२/४८) यांनी विंडीजला झटपट गुंडाळले.

पाककडून सामनावीर बाबर अाझमने शतक ठाेकले. त्याने १२६ चेंडूंत ९ चाैकार व एका षटकारासह १२३ धावा काढल्या. तसेच शाेएब मलिकने ८४ चेंडूंत ९० धावा काढल्या. यात तीन चाैकार अाणि सहा चाैकारांचा समावेश अाहे. त्यानंतर सरफराज अहमदने नाबाद ६० धावांची खेळी करून पाकला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.
बातम्या आणखी आहेत...