आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी क्रिकेटर शहजादचा निकाह, बघा पत्नीसोबतचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- पाकिस्तानी स्टार क्रिकेटर अहमद शहजादचे काल धुमधडाक्यात लग्न झाले. लाहोरमधील एका हॉटेलमध्ये निकाह पार पडला. या नवदांपत्याला पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने ट्विट करुन अभिनंदन दिले आहे. या लग्नात पाकिस्तानी क्रिकेट टीमचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते. शाहिद आफ्रिदी आणि त्याची पत्नी नादिया हेही उपस्थित होते.
तरुणी म्हणाल्या, हार्ट ब्रेक
पाकिस्तानी क्रिकेट संघात शहजाद सर्वांत सुंदर असल्याचे सांगितले जाते. त्याचे लग्न होणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यावर अनेक तरुणी फॅन्सनी हार्ट ब्रेक झाल्याचे ट्विट केले. एक तरुणी फॅन म्हणाली, की आता मला घरी हो म्हणून सांगावे लागेल. आता तू माझा होऊ शकत नाहीस. एका फॅनने तर आजन्म लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, शहजादचा निकाह... त्याचे पत्नीसोबतचे फोटो....