आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Cricketer Shahid Afridi Marriage With His Cousin Nadia Fixed By His Father

शिक्षिकेला पाहताच प्रेमात पडला होता आफ्रिदी, मात्र मामाच्या मुलीशीच झाले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी आणि पत्नी नादियासह शाहिद आफ्रिदी. - Divya Marathi
मुलगी आणि पत्नी नादियासह शाहिद आफ्रिदी.
क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आणि पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज शाहिद आफ्रिदी हा आपल्या मैदानावरील प्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र एक सेलिब्रिटी असतानाही त्याचे कुटुंब कधीच लाइम लाइटमध्ये आले नाही. त्याने त्याच्या मामाच्याच मुलीशी लग्न केले आहे. या कपलला चार मुलीही आहेत.
कुणाच्या पसंतीने केले लग्न
- शाहिद आफ्रिदी फार ट्रेडिशनल असल्याचे मानले जाते. तो त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कधीच माध्यमांसमोर बोलत नाही. मात्र जेव्हा-जेव्हा त्याला त्याच्या पत्नी विषयी विचारलेजाते, तो मोठ्या दिलखुलासपणे उत्तरे देतो.
- एका इंटरव्हूमध्ये शाहिदला त्याच्या लग्नासंदर्भात विचारले असता त्याने सांगितले होते की, एका दौर्‍यावर जाण्याआधी मी माझ्या वडिलांची मजाक केली होती.
- मी त्यांना म्हणालो होतो की, माझासाठी एक मुलगी बघा.
- मात्र माझे बोलने त्यांनी जरा जास्तच सिरिअस घेतले.
- जेव्हा मी टोर्नामेंट संपल्यावर परदेशातून पतरलो तेव्हा, ते मला घराच्या गच्चीवर घेऊन गेले आणि म्हणाले की, मी तुझा साखरपुडा उरकला आहे.
- हे ऐकूण मी शॉक झालो. आश्चर्याची गोष्ट तर ही की, शाहिदची होणारी पत्नी दुसरी- तिसरी कुणी नसून त्याच्याच मामाची मुलगी नादिया होती.
लग्नानंतर पहिल्या सामन्यात चमकला
- शाहिद आफ्रिदी आणि नादिया यांचा विवाह 22 ऑक्टोबर, 2000 रोजी झाला.
- इंग्लंडविरुद्ध सीरीज सुरू होती. शाहिद लग्नाच्य दुसर्‍याच दिवशी टीमसोबत गेला होता.
- लग्नानंतर लाहोरमध्ये झालेल्या या पहिल्याच सामन्यात आफ्रिदीने खळबळ उडवून दिली.
- त्याने या सामन्यात हाफसेंच्युरी करत तब्बल 5 विकेट्स घेल्या.
- त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले तत्कालीन
राष्ट्रपति मुशर्रफ यानीही त्याचे कौतुक केले होते.
हे होते पहिले प्रेम...
- एकदा शाहिद आफ्रिदीने स्वतःच खुलासा केला होता की, तो शाळेत शिकत असतानाच प्रेमात पडला होता.
- तो जिच्या प्रेमात पडला ती कुणी दुसरी-तिसरी नसून खुद्द त्यला शिकवणारीच एक शिक्षिका होती.
- त्याने गमतीने असेही सांगितले होते की, ते लहानपण होते. तेव्हा मी केवळ 9 वर्षांचा होतो.
- मी टीचरच्याच प्रेमात पडलो होतो. ती फार सुंदर होती.
- शाहिद आणि नादियाला अक्सा, अज्वा, अस्मरा आणि अनस्पा अशा चार मुली आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबियांचे काही खास PHOTO'S...