आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या विजयावर पाकिस्तानचा आनंदोत्सव, अशी उडवली टीम इंडियाची खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारताने टी20 सिरिजच्या पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 ची लीड घेतली आहे. हा सामना टीम इंडिया ने जिंकला पण त्याचा फायदा पाकिस्तानला झाला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. या मॅचच्या आधी टी20 रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा संघ 125 अंकांसह पहिल्या क्रमांकावर होता. तर पाकिस्तान 124 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर होता. पण भारताकडून पराभवामुळे न्यूझीलंडला 4 गुण गमवावे लागले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आपोआप पहिल्या क्रमांकावर गेला. त्यामुळे हा सामना संपल्यानंतर पाकिस्तानी फॅन्सनेही भारताच्या विजयाचा जल्लोष केला. पण यावरून त्यांनी भारताची खिल्लीही उडवली. एका यूझरने टीम इंडियाचा फोटो शेयर करत लिहिले, इंडियन प्लेयर्स हात वर करत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचे सांगत आहेत.. हाहाहा थँक्स विराट... लगे रहो..

पुढील स्लाइड्सवर पाहा, टीम इंडियाच्या विजयानंतर पाकिस्तानींनी अशी उडवली खिल्ली... 
बातम्या आणखी आहेत...