आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Wicket Keeper Sarfraz Ahmed In Elite List Of Top Ten Batsman

धोनीला मागे टाकत या पाक खेळाडूने मारली बाजी, एलिट ग्रूपमध्ये आता 3 ऱ्या स्थानावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान-श्रीलंकेदरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन असलेल्या सरफराज अहमदने पहिल्याच डावामध्ये नॉट आउट 78 रनांचा डाव खेळला.
या सोबतच तो सर्वोच्च एव्हरेज असलेल्या टॉप 10 विकेटकीपर बॅट्समनच्या एलिट ग्रूपमध्ये सामिल झाला. यामध्ये केवल त्याच खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी कसोटी सामन्यात 1000 अथवा त्यापेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. या यादीत सरफराज तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने 18 कसोटी सामन्यात 50.30 च्या अॅव्हरेजने 1157 रन बनवले आहेत.

10 व्या क्रमांकावर आहे धोनी
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्र सिंग धोनीसुध्दा या एलिट ग्रूपमध्ये आहे. धोनीचा आज वाढदिवस असून त्याने आज ३४ वा वाढदिवस साजरा केला. तो या लिस्टमध्ये 10 क्रमांकावर आहे. धोनीने 90 कसोटी सामन्यात 38.09 च्या एव्हरेजने 4876 धावा काढल्या आहेत, ज्यामध्ये 6 शतक आणि 33 अर्धशतक आहेत.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या एलिट ग्रूपमध्ये कोणकोणत्या 10 खेळाडूंचा समावेश आहे.

नोट: या स्लाईड्समध्ये केवळ त्याच सामन्यांची आकडेवारी आहे, ज्यामध्ये संबंधित खेळाडू विकेटकीपर होता...