आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यासिरच्या फिरकीत श्रीलंका अडकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाले / न्यूयाॅर्क - यासिर शहाच्या दमदार फिरकी गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने यजमान श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत १० विकेटने दणदणीत विजय मिळवला. लेगब्रेक गोलंदाज यासिर शहाने श्रीलंकेच्या दुसर्‍या डावात ७ आणि सामन्यात ९ गडी बाद केले.

सामन्याच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेचा डाव २०६ धावांत आटोपला. पाकिस्तानने पहिल्या डावात ११७ धावांची आघाडी घेतली होती. यामुळे त्यांना अवघे ९२ धावांचे लक्ष्य मिळाले. यानंतर मो. हफिज (नाबाद ४६) आणि अहेमद शहजाद (नाबाद ४३) यांनी वेगवान फलंदाजी करताना अवघ्या १२ षटकांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

यासिरच वरचढ
तत्पूर्वी, श्रीलंकेने २ बाद ६३ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून सलामीवीर करुणारत्नेने ७९ धावांची खेळी केली. थिरिमाने (४४) आणि चांदिमल (३८) यांनीसुद्धा संघर्ष केला. मात्र, यांच्यावर यासिर शहाची फिरकी वरचढ ठरली. शहाने करुणा आणि चांदिमलच्या विकेटच घेतल्या नाहीत, तर इतर पाच फलंदाजांनाही बाद केले. वहाब रियाजने थिरिमानेसह दोघांना बाद केले. यासिर शहाची फिरकी श्रीलंकेच्या फलंदाजांना वरचढ ठरली.़ त्याची गोलंदाजी निर्णायक ठरली.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका ३०० आणि २०६. पाकिस्तान ४१७ आणि बिनबाद ९२.
बातम्या आणखी आहेत...