आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पार्थिवचे कसोटीत 8 वर्षांनंतर पुनरागमन; 70 वर्षांचे मोडणार रेकॉर्ड, शेवटची कसोटी सोबत खेळलेल्या खेळाडूंचा संन्यास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पार्थिव पटेल ८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर टीम इंडियामध्ये परतला आहे. त्याच्या पुनरागमनाने केवळ क्रिकेट रसिकांनाच आश्चर्यचकित केले नाही तर क्रिकेटचे अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. उदा. त्याच्या शेवटच्या कसोटीत खेळणाऱ्या १० पैकी ८ खेळाडूंनी संन्यास घेतला आहे. नववा हरभजन सिंग दोन वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. तर १०व्या ईशांत शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळत नाही आहे.

३१ वर्षांच्या पार्थिवने २००२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये योगदान दिले. तेव्हा सर्वात कमी वयाच्या यष्टिरक्षकाचा त्याने रेकॉर्ड नोंदवले होते. आता इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पदार्पण झाल्यानंतर तो टीम इंडियाचा तिसरा सर्वात बुजुर्ग खेळाडू ठरला आहे. अमित मिश्रा (३४ ) आणि मुरली विजय (३२) हेच त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत.

पार्थिव २००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच पहिली कसोटी खेळत होता तेव्हा टीमचा कोणताही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट तर सोडाच, पण रणजीही खेळलेला नव्हता. कर्णधार विराट कोहली तर तेव्हा दिल्लीच्या अंडर-१४ टीममध्ये होता. विराटने पहिली कसोटी पार्थिवच्या शेवटच्या कसोटीनंतर तीन वर्षांनी खेळली होती. एवढेच नव्हे तर ईशांत सोडला तर पार्थिवच्या शेवटच्या कसोटीनंतरच टीम इंडियाचे सर्व खेळाडू कसोटी खेळले. पार्थिवच्या आधी किंवा सोबत कसोटी खेळलेला एकही खेळाडू इंग्लंडच्या टीममध्येही नाही.

पार्थिव पटेल २६ नोव्हेंबरला सर्वात प्रदीर्घ खंडानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करणारा क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी लाला अमरनाथ १२ वर्षे आणि सी. के. नायडूसह ४ भारतीय १९४६ मध्ये १० वर्षांच्या खंडानंतर कसोटी खेळले होते. २०१२ मध्ये पार्थिवने शेवटची कसोटी वानखेडेवर खेळली होती.

रणजीत ६० च्या सरासरीने धावा
यंदा रणजीत पार्थिवने ६०, दिनेश कार्तिकने ६४ व ऋषभ पंतने ९७ च्या सरासरीने धावा ठोकल्या. मात्र पार्थिवला उत्तम क्षेत्ररक्षण व डावखुरेपणामुळे पसंती मिळाली आहे. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक डावखुरा स्पिनर असतो.
बातम्या आणखी आहेत...