आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ वर्षांनी पार्थिव पटेलचे भारतीय संघात पुनरागमन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - मोहाली कसोटीसाठी पार्थिव पटेलची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा जखमी झाल्यामुळे तो तिसऱ्या कसोटीतून संघाबाहेर झाला. त्याच्या जागी बीसीसीआयने पार्थिव पटेलची निवड केली. पार्थिवने तब्बल ८ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पार्थिवने आपला अखेरचा कसोटी सामना कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध २००८ मध्ये खेळला होता. पार्थिव पटेलने आपल्या कारकीर्दीत २० कसोटी, ३८ वनडे आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. पार्थिवचे १४ वर्षांपूर्वी २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण झाले होते. धोनी संघाचा कर्णधार विकेटकिपर बनला तेव्हापासून त्याला संधी मिळाली नाही. पार्थिव रणजीत फॉर्मात असून त्याने मध्य प्रदेशविरुद्ध शतक ठोकले होते. पार्थिवने २० कसोटींत २९.६९ च्या सरासरीने ६८३ धावा काढल्या आहेत. यात त्याने चार अर्धशतके ठोकली.

तिसरी कसोटी शनिवारपासून मोहालीत होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...