आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदीची भारताला धमकी, म्हणाला- पाक सीमेवर आहेत पठाण, जरा जपून!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एके- 47 सह क्रिकेटर शाहिद आफ्रिदी... - Divya Marathi
एके- 47 सह क्रिकेटर शाहिद आफ्रिदी...
स्पोर्ट्स डेस्क- भारतातील सर्जिकल स्ट्राईकनंतर शांततेचे आव्हान करणारा पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने आता भारताविरोधात विष ओकायला सुरुवात केली आहे. आफ्रिदीने भारताला धमकी वजा इशारा देताना म्हटले की, पाकिस्तान सीमेवर पठाण तैनात आहेत आणि त्याच्यापासून जरा संभाळून राहा...
आफ्रिदी स्वत: आहे पठाण-
- एक क्रिकेट शोमध्ये आफ्रिदीला जेव्हा भारतीय लष्कराच्या भीतीबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्याने वरील उत्तर दिले.
- 36 वर्षाच्या या क्रिकेटरने म्हटले की, भारत देश पाकिस्तान लष्कराला अजून पुरेश ओळखत नाही. यात पठाण तैनात आहेत. सा-या पाकिस्तानच्या सीमेवर पठाण सुरक्षा करत आहेत.
- भारताने त्यांच्यापासून जरा सावध राहावे.
- शाहिद आफ्रिदी स्वत: एक पठाण आहे.
पाकिस्तान शांतताप्रिय देश-
- याआधी आफ्रिदीने सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेक ट्वीट केली होती तसेच पाकिस्तान शांतताप्रिय देश असल्याचे म्हटले होते.
- त्याच्या या ट्वीटनंतर त्याची जोरदार खिल्ली उडवली गेली होती. लोकांनी म्हटले होते की, आफ्रिदी भारतीय लष्कराला घाबरला.
- आफ्रिदीने म्हटले होते की, जेव्हा चर्चेतून एखादा प्रश्न सुटू शकतो तेव्हा अशी मोठी पावले उचलण्याची काय गरज आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, जेव्हा आफ्रिदीने घेतला कश्मीरचा सहारा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...