आय पीएल-9 चा सर्वात महागडा भारतीय क्रिकेटर ठरलेल्या पवन नेगीची बहीणही एखाद्या स्टार पेक्षा कमी नाही. भावापेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेली बबितादेखील क्रिकेट आहे. ती राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहे. दिल्ली संघाकडून खेळणारी बबिता इंडियन रेल्वेमध्ये सीनिअर क्लार्क म्हणून नोकरीही करते.
कशी पोहोचली क्रिकेटच्या मैदानावर, काय आहे फॅमिली बॅकग्राउंड...
- एका मुलाखतीत बबिताने सांगीतले होते की, ती छोट्या भावाला क्रिकेट खेळताना पाहूनच या खेळाकडे वळली.
- पवनसारखीच तीही स्पिनर (लेफ्ट आर्म) आहे.
- नेगीचे कुटुंब दक्षिण दिल्ली मधील सादिक नगरच्या सेक्टर-3 मध्ये राहते. मात्र, ते मुळतः उत्तराखंडचे आहेत.
- पवन आणि बबिताचे अजोबा नोकरी मुळे काही वर्षांपूर्वी दिल्लीला शिफ्ट झाले.
बबिता नेगीचे क्रिकेट करियर
फॉरमॅट | मॅच | विकेट | बेस्ट | इकोनॉमी |
टी20 | 23 | 22 | 3/14 | 4.01 |
वन डे | 39 | 51 | 4/24 | 2.89 |
दोन दिवसात स्टार झाला नेगी
- पवन नेगी 1 फेब्रुवारीला सर्वप्रथम श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर चर्चेत आला होता.
- त्याची विराट कोहलीच्या स्थानी तीन सामन्यांच्या मालीकेसाठी निवड करण्यात आली आहे.
- यानंतर 5 फेब्रुवारीला आशिया कपसाठी आणि टी-20 वर्ल्ड कप संघासाठी निवड झाली आहे.
- या नंतर 6 फेब्रुवारीला तो आयपीएल-9 च्या लिलावातील सर्वात महागडा भारतीय क्रिकेटर ठरला.
- 30 लाखांची बेस प्राइज असलेल्या या क्रिकेटरला दिल्ली डेअरडेविल्सने 8.5 कोटींमध्ये विकत घेतले.
- पवन नेगी ऑलराउंडर असून तो आयपीएल-8 मध्ये धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पवन नेगीच्या बहिनीचे काही खास PHOTO'S...