आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PCB Chief Said India Invited Pakistan To Play Cricket Series

पाक भारतात क्रिकेट खेळणार? BCCI ने दिले आमंत्रण, पीसीबीचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने नुकतेच पाकिस्तानला भारतात मालिकेसाठी आमंत्रण पाठवले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी शनिवारी हा दावा केला. पाकिस्तानला मात्र ही मालिका भारतात नव्हे तर यूएईमध्ये खेळण्याची इच्छा आहे. त्यापूर्वी शुक्रवारी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डच्या एक्झिक्युटिव्ह कमेटीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी भारतात न खेळण्याची वकिली केली होती. दुसरीकडे टी-20 टीमचा कर्णधार शाहीद आफ्रिदीनेही उत्पन्नापैकी 50% रक्कम मिळाली तरच खेळण्याची अट ठेवली होती.

आतापर्यंत भारत सरकारची भूमिका अशी होती की, जोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सुधारत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचे नाही. त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनीही नुकतेच म्हटले होते की, आम्हाला बीसीसीआयकडून पाकिस्तानबरोबरच्या मालिकेच्या मंजुरीसंदर्भात कोणताही अर्ज मिळालेला नाही.

2012 मध्ये झाली होती अखेरची मालिका
भारत-पाकिस्तानने 2012 नंतर अद्याप एकमेकांच्या विरोधात मालिका खेळलेली नाही. 2012 मध्ये पाकिस्तानची टीम भारतात खेळण्यासाठी आली होती. पण ती मालिका केवळ तीन वन डेची होती. त्यानंतर दोन्ही संघ केवळ वर्ल्ड कप 2015, आशिया कप अशाच मालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळले आहेत.
आफ्रिदी म्हणाला, BCCI ची कोट्यवधींची कमाई, आमचे खिसे मात्र रिकामे
पाकिस्तानच्या टी-20 टीमचा कर्णधार शाहीद आफ्रिदी म्हणाला की, आम्ही भारतात एकाच अटीवर खेळू. ती म्हणजे BCCI ने PCB चे अध्यक्ष शहरयार खान यांना कमाईत वाटा देण्याची लेखी हमी द्यावी. आफ्रिदी म्हणाला, मला आठवते, 2012-13 मध्ये आम्ही भारतात खेळलो होतो. त्यावेळी बीसीसीआईने कोट्वधी रुपये कमावले. पण आम्हाला काहीही मिळाले नाही.

काय म्हटले होते, बीसीसीआयने?
आफ्रिदीची ही प्रतिक्रिया तेव्हा आली जेव्हा बीसीसीआयने मालिका पाकिस्तान किंवा यूएईऐवजी भारतात खेळण्याची मागणी केली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर नुकतेच म्हणाले होते की, आम्ही पाकिस्तानबरोबर डिसेंबरमध्ये मालिका खेळू, पण ती भारतात व्हायला हवी. पाकिस्तान किंवा यूएईमध्ये नव्हे. याबाबत आम्ही गृहमंत्रालयाबरोबर चर्चा करत आहोत.