आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PCB Chief Threatens To Boycott India In All ICC Events

पाकच्‍या क्रिकेट बोर्डाची भारताला धमकी, आमच्‍याशी खेळा, अन्‍यथा बहिष्‍कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीसीबी चीफ शहरयार खान. - Divya Marathi
पीसीबी चीफ शहरयार खान.
कराची- पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) BCCI, ICC आणि ACC (आशियाई क्रिकेट कौन्सिल) इव्‍हेंटमध्‍ये बहिष्‍कार टाकण्याची धमकी भारताला दिली आहे. भारताने डिसेंबरमध्‍ये प्रस्‍तावित क्रिकेट मालिका खेळली नाही, तर पाकिस्‍तान त्‍यांच्‍यासोबत आयसीसी सामना खेळणार नाही असे PCB चीफ शरहयार खान यांनी म्‍हटले आहे.
काय म्‍हणाले शहरयार
पाकिस्तानी वृत्‍तपत्र 'एक्सप्रेस' मधील बातमीनुसार शहरयार खान म्‍हणाले, “ जर, भारताने डिसेंबरमध्‍ये होणा-या मालिकेत पाकसोबत खेळणे टाळले, तर पाकिस्तान त्‍यांच्‍यासोबत आयसीसी आणि एसीसीच्‍या कोणत्‍याच इव्‍हेंटमध्‍ये भाग घेणार नाही.” खान असेही म्‍हणाले, "बीसीसीआयने अजूनही या संदर्भात भारत सरकारची परवानगी घेतली नाही. ही शरमेची बाब आहे."

बीसीसीआयने दृष्टिकोन बदलावा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने म्‍हटले आहे की, डिसेंबरमध्‍ये होणा-या मालिकेविषयी बीसीसीआयने आपला दृष्‍टिकोण बदलावा. पीसीबीने खुप आधी बीसीसीआयला या मालिकेचे निमंत्रण पत्र पाठवले आहे. शहरयार म्‍हणाले, “मी 28 ऑगस्टला पत्र पाठवले मात्र अजुनही उत्‍तर मिळाले नाही. त्‍यामुळे आम्ही प्रतिसादाची वाट पाहत आहो. बीसीसीआयने आम्‍हाला साफ सांगावे की, ते मालिका खेळण्‍यात तयार आहेत किंवा नाही.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पाक खेळाडू आणि बीसीसीआय सेक्रेटरी ठाकुर यांच्‍या प्रतिक्रीया...