आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PCB President Shaharyar Khan Says Bcci Has Invited Us To Play In India

भारत-पाकिस्तान डिसेंबरमध्ये झुंज, पीसीबीचे शहरयार यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेला अखेर येत्या डिसेंबर महिन्यात मुहूर्त मिळाला असून बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन शहरयार खान यांना अधिकृतरीत्या निमंत्रण दिले आहे. मात्र, याबाबत बीसीसीआयने आपण कोणत्याही प्रकारचे निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना शहरयार खान यांनी सांगितले, ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी शुक्रवारी दूरध्वनीद्वारे आपल्याला भारत विरुद्ध पाकिस्तान मालिका खेळण्यासाठीचे अधिकृत निमंत्रण दिले आहे. पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळण्याची बीसीसीआयला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, ही मालिका संयुक्त अरब अमिरातीत न खेळवता भारतातच खेळवली पाहिजे, असेही मनोहर यांनी स्पष्ट केल्याचे शहरयार खान म्हणाले.

मात्र, उभय बोर्डांमध्ये झालेल्या समझोता करारानुसार पाकिस्तानची स्वगृही होणारी मालिका आखाती देशांमध्ये खेळवण्याचे ठरले होते याची आठवण शहरयार खान यांनी करून दिली. पाकिस्तानविरुद्ध काही राजकीय संघटनांचा आक्षेप असल्यामुळे आपल्या देशवासीयांच्या भावना ही मालिका आखाती देशात व्हावी, अशा असल्याचे शहरयार यांनी म्हटले आहे.

पाक क्रिकेट बोर्डाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चेअरमन नजम सेठी यांनी मात्र भारताच्या या ऑफरचा स्वीकार करू नये, असे मत व्यक्त केले आहे.
कोलकाता, मोहालीत सामने : पाकिस्तान संघाला भारतात सामने खेळण्यासाठी पुरेसा कडेकोट बंदोबस्त देण्याची जबाबदारी बीसीसीआयने स्वीकारली असून मनोहर यांनी हे सामने कोलकाता, मोहालीत खेळवले जातील. पाकिस्तानला स्वगृही होणारी मालिका भारतात खेळवल्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजीही बीसीसीआय घेणार असल्याचे मनोहर यांनी शहरयार खान यांना सांगितले आहे.